World Vegan Day : वेगन डाएट म्हणजे नक्की काय? शरीराला त्याचे होणारे फायदे!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 01:10 PM2018-11-01T13:10:19+5:302018-11-01T13:15:53+5:30
1 नोव्हेंबरला संपूर्ण जगभरामध्ये World Vegan Day साजरा करण्यात येतो. फळं, भाज्या, धान्य, कडधान्य, डाळी, ड्रायफ्रुट्स या गोष्टींचा वेगन डाएटमध्ये समावेश होतो.
1 नोव्हेंबरला संपूर्ण जगभरामध्ये World Vegan Day साजरा करण्यात येतो. फळं, भाज्या, धान्य, कडधान्य, डाळी, ड्रायफ्रुट्स या गोष्टींचा वेगन डाएटमध्ये समावेश होतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, वेगन डाएटमध्ये दूध आणि दूधापासून तयार करण्यात आलेले पदार्थ खाणं टाळण्यात येतं. यामागील कारण म्हणजे गायीपासून जास्तीत जास्त दूध मिळवण्यासाठी तिला खाण्यासाठी आणि पिण्यासाठी जेवढं पाणी दिलं जात नाही त्यापेक्षा जास्त पाणी तिला खाण्यासाठी लागणारा चारा उगवण्यासाठी वापरण्यात येतं. त्यामुळे पर्यावरणाची हानी होते.
त्याचप्रमाणे वेगन डाएटमध्ये प्राण्यांपासून मिळणारं मांस किंवा दूधापासून तयार करण्यात येणारा कोणताही पदार्थ खाण्यास मनाई असते. या वेगन डाएटचा सर्वात महत्त्वाचा हेतू म्हणजे, जर तुम्ही तुमच्या डाएटमधून मांस, दूध आणि अंडी पूर्णपणे काढून टाकत असाल तर तुम्हाला त्यांची कमतरता भरून काढण्यासाठी डाएटमध्ये फळ, भाज्या, धान्य, कडधान्य, डाळी, ड्रायफ्रुट्स यांसारख्या पदार्थांचा समावेश करणं गरजेचं असतं.
व्हिटॅमिन्स, प्रोटीन, फायबर इत्यादी शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळवण्यासाठी डाएटमध्ये व्हरायटी आणणंही गरजेचं असतं. वेगन डाएट कॅलरीशिवाय वाढलेलं वजन कमी करण्यासाठीही मदत करतं. वेगन डाएटमध्येही अनेक प्रकार आढळून येतात.
वेगन डाएटचे प्रकार :
व्होल व्हीट वेगन डाएट : यामध्ये फळं, भाज्या, डाळ, ड्रायफ्रुट्सचा समावेश करण्यात येतो.
रॉ फूड वेगन डाएट : या श्रेणीमध्ये कच्ची फळं, भाज्या, ड्रायफ्रुट्स किंवा वनस्पतींपासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांचा समावेश करण्यात येतो.
थ्राइव डाइट : या डाएटमध्ये व्होल व्हीट आणि रॉ फूड या दोन्ही पदार्थांचा समावेश करण्यात येतो.
'हे' आहेत वेगन डाएट फॉलो करण्याचे फायदे :
- या डाएटमधून मोठ्या प्रमाणावर पोषक तत्व मोठ्या प्रमाणावर असतात.
- वजन कमी करण्यासाठी वेगन डाएट फायदेशीर ठरतं.
- शरीरातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करतं.
- या डाएटमुळे किडनीचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते.
- शरीराला होणाऱ्या वेदना दूर करण्यासाठी वेगन डाएट उपयोगी ठरतं.