समोसा रोजच खात असाल पण समोशाबद्द्ल तुम्हाला हे माहित आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 06:27 PM2017-09-07T18:27:30+5:302017-09-07T18:34:41+5:30

‘समोसा विश्वात’ही खूप काही उलथापालथ होतेय. समोशाचे काही भन्नाट प्रकारही खूप चवीनं खाल्ले जाताहेत. तुम्हाला हे प्रकार माहित आहे का?

You eat samosa regulary. but have you introduced with this changes in samosa world. Its realy intresting | समोसा रोजच खात असाल पण समोशाबद्द्ल तुम्हाला हे माहित आहे का?

समोसा रोजच खात असाल पण समोशाबद्द्ल तुम्हाला हे माहित आहे का?

ठळक मुद्दे* कॉर्नची भरड, मोड आलेले मूग, पनीर,चीज , पोहे, नूडल्स, किओना,मॅकरोनी, सोयाबीन यासारखे घटक आणि विविध मसाले वापरून तयार केलेलं सारण समोशात दिसू लागलं आहे.* समोसा हा केवळ चटक-मटक चवीचा पदार्थ ही ओळख जुनी होत असून गोड पदार्थ म्हणूनही समोसा तयार होऊ लागला आहे.* मैद्याची पारी अर्धगोलाकारात कापून त्रिकोणात दुमडलेला समोसा आपण खात आलोय, पण या व्यतिरिक्त समोशाचे खूप छान आणि वेगवेगळे प्रकार आहेत.

- सारिका पूरकर-गुजराथी


समोसा. मटार आणि बटाट्याचं खमंग सारण भरलेला, खुसखुशीत पारीचा असा समोसा तसा सर्वांच्याच आवडीचा. गरमागरम समोशासोबत तळलेल्या हिरव्यागार मिरच्या, झालंच तर चिंचेची चटणी आणि वाफळत्या चहाचा कप. ही अशी मिनी ट्रिट केव्हाही जमून येते. मुळचा भारतीय नसला तरी समोसा भारतात चांगलाच हिट झालाय. पंजाबी समोसा, लखनवी समोसा या चवी तर आॅल टाईम ग्रेटच आहेत. मात्र सध्या समोसा चाट, नूडल्स समोसा, चायनीज समोसा.. हे समोशाचे काही भन्नाट प्रकारही खूप चवीनं खाल्ले जाताहेत. एवढेच नाही ‘समोसा विश्वात’ही खूप काही उलथापालथ होतेय. मग डोकवायचं का या समोश्याच्या जगात?

सारणाची विविधता

केवळ मटार-बटाट्याचा मसाला भाजी हेच घटक समोश्याच्या सारणापुरते मर्यादित राहिलेले नाहीयेत. तर समोसा देखील अधिक पौष्टिक आणि अधिक टेम्पटिंग कसा बनवता येईल यासाठी देखील विविध प्रकारे सारण तयार केले जाऊ लागले आहेत. कॉर्नची भरड, मोड आलेले मूग, पनीर,चीज , पोहे, नूडल्स, किओना,मॅकरोनी, सोयाबीन यासारखे घटक आणि विविध मसाले वापरून तयार केलेलं सारण समोशात दिसू लागलं आहे.

 

चाट

समोसा होतोय डेझर्ट

समोसा हा केवळ चटक-मटक चवीचा पदार्थ ही ओळख जुनी होत असून गोड पदार्थ म्हणूनही समोसा तयार होऊ लागला आहे. खवा आणि काजूु-बदामाचं सारण भरून केलेला समोसा पाकात बुडवून काढला की तयार होतो शाही समोसा. या शाही समोशातही आता व्हरायटी बघायला मिळते. चॉकलेट समोसा देखील तयार व्हायला लागला आहे आता..
 

विविध आकारातला समोसा

मैद्याची पारी अर्धगोलाकारात कापून त्रिकोणात दुमडलेला समोसा आपण खात आलोय, पण या व्यतिरिक्त समोशाचे खूप छान व वेगवेगळे प्रकार आहेत बरं का !

 


 

1) पट्टी समोसा- हा देखील समोशाचा पारंपरिक आकार व प्रकार आहे . हा आकार बनवण्यासाठी मैद्याची गोल पारी नाही तर लांब आयताकृती पट्टी बनवावी लागते. आता तर या पट्ट्या रेडिमेडही मिळू लागल्या आहेत. पट्टीच्या एका कडेवर सारण भरु न त्रिकोणात ही पट्टी दुमडत नेऊन समोशाचा त्रिकोणी आकार दिला जातो.. पट्टी समोशात पोहे किंवा कांद्याचे सारणही भरलं जातं.

2 ) पिनिव्हल समोसा - पीनिव्हल सॅण्डविच हा स्यांडविचमधील लोकप्रिय प्रकार. त्याचप्रमाणे तो समोशातही आता प्रचिलत होतोय. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपली बाकरवडी असते ना तसा हा पिनिव्हल समोसा. किंवा आपण यास बटाट्याची बाकरवडी म्हटलं तरी चालेल. मैद्याची मोठी पोळी लाटून त्यावर बटाट्याचं सारण पसरवून रोल करून वड्या कापून तळल्या की झाला पिनिव्हल समोसा तयार. सारणात अर्थातच तुम्ही बदल करु शकता. दिसायला एकदम हटके असतो हा समोसा.

 

 

3) समोसा पॉप्स - पॉपिस्कल स्टाईल ( आइस्क्रिमस्टिकला लावलेले ) हा देखील नवा फंडा सध्या कटलेट्स, समोसा यांसाठी वापरला जातोय.. याकरिताही रेडिमेड पेस्ट्री शिट्स मिळतात किंवा घरी देखील मैदा, बेकिंग पावडर, दूध वापरु न तयार केले जातात. या चौकोनी शिटवर सारण पसरवून पॉपिस्कल स्टिक कडेला दाबून त्यावर दुसरे चौकोनी शिट दाबून बंद करून बेक केले की समोसाचा पॉप्स अवतार रेडी..

4) समोसा पफ - याकरिता समोशाची पारी लहान गोलाकारात कापून अ‍ॅल्यूमिनिअम मोल्डमध्ये पसरवून त्यात सारण भरलं जातं. आणि बेक करून जे तयार होते त्यास टोकरी समोसा किंवा समोसा पफ म्हणतात. समोशाचा आणखी एक नवा लूक आपल्याला मिळतो..

5 ) स्ट्रीप समोसा - सध्या स्ट्रीपची फॅशन जोरात आहे. समोसा जगतातही हा फंडा खूप हिट झालाय. मैद्याच्या अर्धगोलाकारावर सुरीनं पट्टीच्या आकारात आडवे कट देऊन ( पूर्ण कापायचे नाही ) यावर पुन्हा दुसरा अर्धगोलाकार ( न कापलेला ) चिकटवून त्यात सारण भरून समोसा बनवला जातो. तळल्यावर याचा लूक एकदम छान दिसतो..

 

 

6)जपानी समोसा - समोशाचा हा लूक व ही चव सध्या दिल्लीकरांना जाम आवडतेय. लेयर्ड समोसा म्हणूनही तो ओळखला जातो. 60 लेयर्ड समोसा हे त्याचे मुळ नाव आहे. आपल्या खारीला कसे छान पापुद्रे असतात तसे यास एकूण 60 लेयर्स असतात. यातही बटाटा आणि मटारचंच सारण भरलं जातं. अत्यंत खुसखुशीत असा हा समोसा पिंडी छोले, लोणचे याबरोबर सर्व्ह केला जातो. चार ते पाच तासांच्या मेहनतीनंतर हा जपानी समोसा तयार होतो. पण याची चव केवळ अफलातून.

 

Web Title: You eat samosa regulary. but have you introduced with this changes in samosa world. Its realy intresting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.