ऑर्गेनिक पदार्थ म्हणजे नक्की काय? जाणून घ्या त्यांचे आरोग्यदायी फायदे!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 12:06 PM2018-07-21T12:06:45+5:302018-07-21T12:07:05+5:30
रोजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात लोकांचं त्यांच्या तब्बेतीकडे आणि जेवणाकडे दुर्लक्ष होत आहे. बऱ्याचदा लोक भूक भागवण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी जंक फूडचा आधार घेतात. परंतु हेच जंक फूड अनेक आजारांचं कारण बनतं.
रोजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात लोकांचं त्यांच्या तब्बेतीकडे आणि जेवणाकडे दुर्लक्ष होत आहे. बऱ्याचदा लोक भूक भागवण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी जंक फूडचा आधार घेतात. परंतु हेच जंक फूड अनेक आजारांचं कारण बनतं. यामुळे लहान वयातच मधुमेह, ब्लड प्रेशर, कॅन्सर यासारख्या आजारांचा सामना करावा लागतो. या आजारांपासून वाचण्यासाठी अनेक जण सध्या ऑर्गेनिक फूडचा आधार घेताना दिसत आहेत. ऑर्गेनिक पदार्थांमध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स, प्रोटीन, कॅल्शिअम, आयर्न यांसारखे गुणधर्म असतात. हे सर्व गुणधर्म शरीराला निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे ऑर्गेनिक पदार्थ खाणं शरीरासाठी फायदेशीर असतं. जाणून घेऊयात ऑर्गेनिक पदार्थांचे शरीराला होणारे फायदे...
ऑर्गेनिक फूड म्हणजे काय?
ऑर्गेनिक फूड तयार करण्यासाठी कोणत्याही केमिकल किंवा औषधांचा उपयोग केला जात नाही. तसेच या पदार्थांची शेती करताना कोणत्याही रासायनिक खतांचा वापर केला जात नाही. ऑर्गेनिक पदार्थ पूर्णतः नैसर्गिक पद्धतीनं उगवण्यात येतात. तरीही इतर पदार्थ आणि ऑर्गेनिक पदार्थ यांमध्ये फरक करणं थोडं अवघड असतं. कारण हे पदार्थ इतर पदार्थांसारखेच दिसतात. त्यांचा आकार, रंग इतर पदार्थांप्रमाणेच असतं.
असे ओळखा ऑर्गेनिक पदार्थ...
ऑर्गेनिक पदार्थ आणि इतर पदार्थ एकसारखेच दिसतात. पण ऑर्गेनिक पदार्थांमध्ये सर्टिफाइड स्टिकर्स लावण्यात येत असून, त्यांची चवही इतर पदार्थांपेक्षा थोडी वेगळी असते. ऑर्गेनिक पदार्थांपासून तयार करण्यात आलेल्या मसाल्यांचा गंधही इतर मसाल्यांपेक्षा जास्त येतो. तसेच ऑर्गेनिक पद्धतीनं पिकवण्यात आलेल्या भाज्या शिजण्यासाठी जास्त वेळ घेत नाहीत, लवकर शिजतात.
आजारांपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर
ऑर्गेनिक पदार्थांचे उत्पादन घेताना कोणत्याही केमिकल्सचा वापर करण्यात येत नाही त्यामुळे त्याच्यामध्ये पोषक तत्वं ही इतर पदार्थांच्या तुलनेनं अधिक असतात. त्यामुळे त्यांच्या सेवनानं ब्लड प्रेशरशी निगडीत समस्या, मायग्रेन, मधुमेह आणि कॅन्सर यांसारख्या आजारांपासून बचाव होतो. तसेच यांचे सेवन केल्यानं शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. या पदार्थांमध्ये फॅट्सचे प्रमाणही फार कमी असतं. याव्यतिरीक्त दररोज ऑर्गेनिक पदार्थांचं सेवन केल्यानं त्वचेच्या समस्या दूर होतात आणि त्वचा तजेलदार होते.
ऑर्गेनिक पदार्थांची खरेदी करताना या गोष्टींची काळजी घ्यावी.
- ऑर्गेनिक पदार्थ खरेदी करताना ते सर्टिफाइड असतील याची काळजी घ्या.
- ऑर्गेनिक पदार्थांचा वापर करताना पॅकेटवर देण्यात आलेली माहिती वाचून घ्या.
- योग्या ठिकाणांहूनच ऑर्गेनिक पदार्थांची खरेदी करा.