घरात अडगळीत पडलेल्या यलो प्लेटमधून एक तरूण करतोय देशभ्रमंती. यलो प्लेट घेवून तो शोधतोय प्रत्येक राज्यातला अस्सल पदार्थ!
By admin | Published: June 27, 2017 06:42 PM2017-06-27T18:42:10+5:302017-06-27T18:42:10+5:30
हिमांशू सेहगल या युवकानं घरात एक दिवस पिवळ्या रंगाची वापरात नसलेली प्लेट पाहिली, ती प्लेट घेऊन तो निघालाय एका खाद्य भ्रमंतीला .
-सारिका पूरकर-गुजराथी
तो एक जनरेशन नेक्स्टचे प्रतिनिधीत्व करणारा तरुण . संगणक अभियंता. डिजिटल मार्केटिंग सल्लागार म्हणून चांगला जॉब. चांगलं लाईफस्टाईल. सर्व एकदम छान. ..पण तरीही तो अस्वस्थ होता. आपण जे करतोय ते आपल्याला करायचं नाहीये. .जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे मानवी जीवन आहे आणि ते असं फक्त नोकरी करण्यात घालवायचं नाही एवढंच त्याला ठाऊक . ही अस्वस्थता मनात बाळगल्यानेच मन नोकरीत रमत नव्हतं. काय करावं सुचत नव्हतं. आणि अचानक एक दिवस घरातील किचनमध्ये पडलेल्या यलो प्लेटनं त्याचं आयुष्य बदलून टाकलं. त्याला एक नवं स्वप्न या यलो प्लेटनं दिलं. तो अक्षरश: नव्यानं या यलो प्लेटच्या प्रेमात पडला आणि आज या यलो प्लेटशिवाय त्याचं आयुष्य तो इमॅजिनही करत नाही. तुम्ही म्हणाल काय भानगड आहे ही?
पण घरचे मात्र हिमांशूच्या या यलो प्लेट प्रेमाला वैतागले आहेत. कोण लग्न करणार याच्याशी म्हणून त्यांना प्रश्न पडलाय. अर्थात हिमांशूने ते मनाला लावून घेतलेलं नाही.