पुणेकरानं Zomato वरुन केली २८ लाखांची ऑर्डर, तर यंदाच्या वर्षात 'या' डिशला सर्वाधिक मागणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 05:04 PM2022-12-30T17:04:48+5:302022-12-30T17:05:57+5:30

भारतीय लोक मूळातच खवय्ये मानले जातात. पण यंदाच्या वर्षात भारतीयांनी कोणती डिश सर्वाधिक ऑर्डर केली याचा रिपोर्ट कार्ड झोमेटो कंपनीनं प्रसिद्ध केला आहे.

zomato report card pune man tejas ordered food worth over rs 28 lakh on platform in 2022 | पुणेकरानं Zomato वरुन केली २८ लाखांची ऑर्डर, तर यंदाच्या वर्षात 'या' डिशला सर्वाधिक मागणी!

पुणेकरानं Zomato वरुन केली २८ लाखांची ऑर्डर, तर यंदाच्या वर्षात 'या' डिशला सर्वाधिक मागणी!

googlenewsNext

भारतीय लोक मूळातच खवय्ये मानले जातात. पण यंदाच्या वर्षात भारतीयांनी कोणती डिश सर्वाधिक ऑर्डर केली याचा रिपोर्ट कार्ड झोमेटो कंपनीनं प्रसिद्ध केला आहे. २०२२ या वर्षात ग्राहकांनी सर्वाधिक ऑर्डर केलेली डिश म्हणजे बिर्याणी. तर लक्षवेधी बाब अशी की २०२२ या वर्षात एकाच व्यक्तीनं झोमेटोवरुन तब्बल २८ लाख रुपयांची फूड ऑर्डर दिली होती. 

दर मिनिटाला १८६ बिर्याणीच्या ऑर्डर
Zomato च्या रिपोर्टनुसार २०२२ या वर्षात युझर्सकडून दर मिनिटाला कंपनीला सरासरी १८६ बिर्याणीच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. झोमेटो या ऑनलाइन फूड डिलिव्हरी सेगमेंटमध्ये प्रतिस्पर्धी असलेल्या स्विगी कंपनीला देखील बिर्याणीच्याच सर्वाधिक ऑर्डर मिळाल्या आहेत. स्विगीच्या पोर्टलवरुन दर मिनिटाला १३७ बिर्याणीच्या ऑर्डर केल्या गेल्या आहेत. बिर्याणीनंतर झोमेटोवर सर्वाधिक ऑर्डर केलेल्या डिशच्या क्रमवारीत पिझ्झा चा नंबर लागला आहे. 

सलग सातव्या वर्षी बिर्याणी टॉपवर
स्विगीनुसार, बिर्याणी व्यतिरिक्त सर्वाधिक ऑर्डर मिळालेल्या डिशमध्ये तंदुरी चिकन, बटन नान, व्हेज फ्राइड राइस, पनीर बटर मसाला, चिकन फ्राइड राइस यांचा समावेश आहे. पण बिर्याणीनंतर सर्वाधिक ऑर्डर केलेला पदार्थ म्हणजे डोसा आहे. सलग सात वर्ष बिर्याणीच अव्वल क्रमांकावर आहे. 

एका खवय्याकडून तब्बल २८ लाखाची ऑर्डर
झोमेटोच्या एका ग्राहकानं तर कमालच केली आहे. पुण्यातील तेजस नावाच्या व्यक्तीनं २०२२ या वर्षात एकूण मिळून तब्बल २८,५९,६११ रुपयांची ऑर्डर केली आहे. तर दिल्लीच्या अंकुरनं दररोज ९ वेळा झोमेटोवरुन जेवण ऑर्डर केलं आहे. अशापद्धतीनं त्यानं वर्षभरात एकूण मिळून ३३३० वेळा झोमेटोवरुन जेवण ऑर्डर केलं आहे. त्यामुळेच अंकुरला सर्वात मोठा फूडी म्हणून कंपनीनं घोषीत केलं आहे. झोमेटोनं आणखी एका ग्राहकाची माहिती देताना सांगितलं की त्यानं २०२२ या वर्षात १०९८ वेळा केक ऑर्डर केला आहे. 

खरगपूरच्या टीनानं एकाचवेळी २५,४५५ रुपयांच्या पिझ्झाची ऑर्डर दिली होती. पण कंपनीला यंदाच्या वर्षात रवि नावाचा ग्राहक चांगलाच महागात पडला आहे. कारण त्यानं वर्षभरात ऑनलाइन ऑर्डर करत ६.९६ लाख रुपयांचा डिस्काऊंट मिळवला आहे. तर पश्चिम बंगालच्या रायगंज शहरात सर्वाधिक कूपन कोडचा वापर झाल्याचंही झोमेटोनं जाहीर केलं आहे.  

Web Title: zomato report card pune man tejas ordered food worth over rs 28 lakh on platform in 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Zomatoझोमॅटो