भारताच्या सुवर्णयुगातील दिग्गज फुटबॉलपटू पी के बॅनर्जी यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 02:13 PM2020-03-20T14:13:00+5:302020-03-20T14:53:10+5:30
भारताचे दिग्गज फुटबॉलपटू पी के बॅनर्जी यांचे शुक्रवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले
भारताचे दिग्गज फुटबॉलपटू पी के बॅनर्जी यांचे शुक्रवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. १९६२च्या आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या भारतीय फुटबॉल संघाचे ते सदस्य होते. भारतीय फुटबॉलच्या सुवर्णयुगातील यशस्वी स्ट्रायकर म्हणून बॅनर्जी ओळखले जायचे. गेल्या काही दिवसांपासून न्यूमोनियामुळे त्यांना श्वसनाचा त्रास होत होता.
AIFF condoles Pradip Kumar Banerjee’s death 💐🙏
— Indian Football Team (@IndianFootball) March 20, 2020
Read 👉 https://t.co/85VIXPdbAM#IndianFootball ⚽ pic.twitter.com/OQ9Tq22iU9
त्यांना यापूर्वी पार्किन्सनचा आणि हृदयाचा आजारही होती. २ मार्चपासून ते लाईफ सपोर्टवर होते आणि शुक्रवारी दुपारी १२.४० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. २३ जून १९३६ मध्ये त्यांचा पश्चिम बंगाल येथील जलपैगूरी येथे जन्म झाला. त्यांनी देशाकडून ८४ सामन्यांत ६५ गोल केले आहेत. भारतीय फुटबॉलमधील त्यांचं योगदान पाहता जागतिक फुटबॉल संघटनेनं ( FIFA) त्यांचा २००४ साली गौरव केला होता.
याशिवाय त्यांनी १९९२च्या आशियाई स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले आहे. १९६०च्या रोम ऑलिम्पिक स्पर्धेत बॅनर्जी यांनी भारतीच संघाचे नेतृत्व सांभाळले होते. त्यात त्यांनी केलेल्या गोलच्या जोरावर भारतीय संघानं फ्रेंच संघाला १-१ अशा बरोबरीत रोखले होते. १९५६च्या मेलबर्न ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करताना भारतीय संघाला उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर ४-२ असा विजय मिळवून दिला होता.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Corona Virus : ...अन् इंग्लंडचा खेळाडू बनला अन्नदाता; शाळकरी मुलांना पुरवतोय जेवण!
Corona Virusशी मुकाबला करण्यासाठी शेन वॉर्नचा मोठा निर्णय; तुम्हीही कराल कौतुक
Corona Virus : विरुष्काचं लोकांना महत्त्वपूर्ण आवाहन; पाहा व्हिडीओ
बोल्ड अँड ब्युटिफुल टेनिसस्टार असं काही बोलली की जगभरातील चाहते 'सुटलेच'!
No Gym नो फिकर... तंदुरुस्तीसाठी इंग्लंडच्या क्रिकेटपटूचा हटके व्यायाम, पाहा व्हिडीओ