राष्ट्रीय फुटबॉल शिबिरासाठी ३० खेळाडूंची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:31 AM2018-05-11T00:31:43+5:302018-05-11T00:31:43+5:30
राष्ट्रीय फुटबॉल कोच स्टीफन कॉन्स्टेन्टाईन यांनी मुंबईत १ जूनपासून सुरू होत असलेल्या इंटरकॉन्टिनेंटल कप स्पर्धेपूर्वी सराव शिबिरासाठी ३० खेळाडूंची निवड केली आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रीय फुटबॉल कोच स्टीफन कॉन्स्टेन्टाईन यांनी मुंबईत १ जूनपासून सुरू होत असलेल्या इंटरकॉन्टिनेंटल कप स्पर्धेपूर्वी सराव शिबिरासाठी ३० खेळाडूंची निवड केली आहे.
राष्ट्रीय शिबिरासाठी निवडण्यात आलेल्या खेळाडूंचे सराव सत्र मुंबईत १६ मेपासून सुरू होईल. या स्पर्धेत यजमान भारताशिवाय केनिया, न्यूझीलंड आणि चिनी तैपई या संघांचा समावेश आहे. २०१९ च्या एएफसी आशिया कपची ही तयारी असल्याचे बोलले जाते. कॉन्स्टेन्टाईन यांनी ही स्पर्धा म्हणजे बलाढ्य संघांविरुद्ध खेळण्याची संधी, असे संबोधले. थायलंडसारखा खेळ असलेल्या चिनी तैपई संघाकडून आम्हाला जे आव्हान मिळणार आहे, त्याचा लाभ आशिया चषकात होईल. केनियाचा संघ शारीरिकदृष्ट्या भक्कम मानला जातो. या सर्व गोष्टी भारतीय खेळाडूंसाठी आत्मसात करण्यासारख्या आहेत. ३० खेळाडू निवडण्यामागे भविष्याचा वेध घेण्यात आला आहे, असेही प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टेन्टाईन म्हणाले. (वृत्तसंस्था)
राष्ट्रीय शिबिरासाठी संभाव्य फुटबॉलपटू
गोलरक्षक : गुरप्रीतसिंग संधू, विशाल केथ, अमरिंदरसिंग, संजीबन घोष
बचाव फळी : लालरूथारा, देविंदरसिंग, प्रीतम कोटल, अनास एदाथोडिका, संदेश ंिझगन, सलाम रंजनसिंग, जेरी लालंिरजुआला, नारायण दास, सुभाशिष बोस.
मध्यरक्षक : उदांतासिंग,, लालदानमाविया राल्टे, सेईमिनलेन डोंगेल, धनपाल गणेश, सौविक चक्रवर्ती, मोहम्मद रफीक, रॉलिन बोर्जेस, प्रणय हलधर, अनिरुद्ध थापा, बिकाश जेरू, हलीचरण नारजरी.
आक्रमक : सुनील छेत्री, बलवंतसिंग, जेजे लालपेखलुआ, मनवीरसिंग, एलेन देओरी, आशिीक करुणियान.