युरोपातील मातब्बर संघ एकमेकांना भिडणार, फुटबॉल चाहत्यांसाठी पर्वणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 03:41 PM2018-09-05T15:41:01+5:302018-09-05T15:41:25+5:30
रशियात नुकत्याच पार पडलेल्या फुटबॉल विश्वचषकाचा ज्वर कमी होण्यापूर्वी युरोपियन फुटबॉल महासंघ (युएफा) दर्दी फुटबॉल चाहत्यांसाठी 55 देशांचा सहभाग असलेल्या Nations League घेऊन आले आहेत.
UEFA Nations League: रशियात नुकत्याच पार पडलेल्या फुटबॉल विश्वचषकाचा ज्वर कमी होण्यापूर्वी युरोपियन फुटबॉल महासंघ (युएफा) दर्दी फुटबॉल चाहत्यांसाठी 55 देशांचा सहभाग असलेल्या Nations League घेऊन आले आहेत. मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय सामन्यांचे अर्थहीन वेळापत्रक रद्दबातल करत युएफाने ही लीग आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. युरोपातील 55 देशांचा सहभाग असलेल्या या लीगला गुरुवारपासून सुरूवात होत आहे.
#NationsLeague J-3⃣ : la nouvelle compétition de pays de l'UEFA débute ce jeudi avec notamment #ALLFRA 🤩
— UEFA Nations League (@EURO2020) September 3, 2018
Pour comprendre son fonctionnement, mode d'emploi ⤵️ pic.twitter.com/NbaAGmFrWW
या 55 संघांची चार गटांत विभागणी करण्यात आली असून प्रत्येक गटातील विजेता 2020च्या युरो स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहे. फिफाच्या क्रमवारीनुसार युरोपातील अव्वल 12 संघ अ गटात असतील, तर ब गटात 12, क गटात 15 आणि ड गटात 16 संघांचा समावेश असणार आहे. होम-अवे अशा फॉरमॅटमध्ये प्रत्येक गटाचे सामने होतील. स्पर्धेचा पहिलाच सामना फ्रान्स आणि जर्मनी या आजी-माजी विजेत्यांमध्ये होणार आहे. त्यापेक्षा या लीगची धडाक्यात सुरूवात होऊच शकत नाही.
#NationsLeague J-4⃣ Un Allemagne-France pour commencer 😍 Quel match attendez-vous le plus?#ALLFRApic.twitter.com/9froHsFSIs
— UEFA Nations League (@EURO2020) September 2, 2018
अ गटातील संघांची विभागणी
गट 1 - फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स
गट 2 - बेल्जियम, आईसलँड, स्वित्झर्लंड
गट 3 - इटली, पोलंड, पोर्तुगाल
गट 4 - क्रोएशिया, इंग्लंड, स्पेन
🇩🇪 #ALLFRA 🇫🇷 #NationsLeague C'est demain!
— UEFA Nations League (@EURO2020) September 5, 2018
Souvenir de cette demi-finale de 2016? pic.twitter.com/TfSRBVoCmJ
स्पर्धेचे वेळापत्रक
पहिला टप्पा - 6 ते 9 सप्टेंबर
दुसरा टप्पा - 9 ते 11 सप्टेंबर
तिसरा टप्पा - 11 ते 13 ऑक्टोबर
चौथा टप्पा - 14 ते 16 ऑक्टोबर
पाचवा टप्पा - 15 ते 17 नोव्हेबर
सहावा टप्पा - 18 ते 20 नोव्हेबर
अंतिम टप्पा - 5 ते 9 जून 2019