खेळाडूंची शालीनता व शिस्त प्रभावित करणारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 12:54 AM2017-10-09T00:54:09+5:302017-10-09T00:54:25+5:30

फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममधील माहोल स्वप्नवत होता. आम्ही मुंबईमध्ये राष्ट्रीय संघाच्या शिबिरात होतो आणि भारत-अमेरिका लढतीबाबत उत्साहित होतो.

 Affecting players' courtesy and discipline | खेळाडूंची शालीनता व शिस्त प्रभावित करणारी

खेळाडूंची शालीनता व शिस्त प्रभावित करणारी

googlenewsNext

गुरप्रीतसिंग संधू लिहितात...
फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममधील माहोल स्वप्नवत होता. आम्ही मुंबईमध्ये राष्ट्रीय संघाच्या शिबिरात होतो आणि भारत-अमेरिका लढतीबाबत उत्साहित होतो. आम्ही सर्वांनी सोबत प्रोजेक्टरवर ही लढत बघितली. हे सर्व काही भारतात होत होते आणि सर्वत्र समाधानाचा माहोल होता. सर्वांनी युवा भारतीय खेळाडूंचा उत्साह वाढविला आणि त्यांच्यासाठी जल्लोष केला. शेवटी आम्ही केव्हापासून या संस्मरणीय क्षणाचे भागीदार होण्यास इच्छुक होतो. वैयक्तिक विचार करता आम्ही सर्व यात सहभागी झालो होतो. मी मैदानावर खेळत असल्याचे मला वाटत होते. आम्ही सर्व जण कुणाला पास द्यायला हवा, केव्हा कुठली रणनीती असावी, केव्हा एंड बदलावे, याबाबत चर्चा करीत होतो.
मी यापूर्वीही म्हटले आहे, की गोलकीपर धीरज सिंगचे भविष्य उज्ज्वल आहे. मी त्याला यापूर्वीही खेळताना बघितले आहे. एक गोलकीपर म्हणून त्याने मोठी सुधारणा केली आहे. त्याने चांगली कामगिरी केली आणि काळानुरूप त्याच्यात आणखी सुधारणा दिसून येईल.
एक गोलकीपर असल्यामुळे सांगू शकतो, की त्याच्यासाठी स्वत:ला अ‍ॅक्शनमध्ये ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. तो ही कला जेवढ्या लवकर आत्मसात करेल तेवढे त्याच्यासाठी चांगले राहील. तुमच्याकडे येणारा पहिला चेंडू आत्मविश्वासाने पकडणे महत्त्वाचे आहे.
या लढतीत समर्पणाची वृत्ती दाखविण्याचे श्रेय संघातील सर्व खेळाडूंना मिळायलाच हवे. भारतीय संघाच्या बचाव फळीने आत्मविश्वास कायम ठेवत हल्ले रोखण्याचा प्रयत्न केला. गरज भासली त्या वेळी धीरजने आपली भूमिका चोख बजावली. या वयात खेळाडूंना मैदानावर अमेरिकेसारख्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध शालीनता व शिस्तबद्ध कामगिरी करताना बघण्याचा अनुभव
सुखद होता.
निकालाचा विचार करता ०-३ हा स्कोअर भारतीय संघाची मैदानावरील कामगिरी दाखविणारा आहे, असे मला वाटत नाही. पण, आता पुढे बघण्याची व दडपण न बाळगता खेळण्याची वेळ आली आहे. आता प्रतिस्पर्धी म्हणून कोलंबिया संघ आहे. अन्य संघ तुलनेने वरचढ असले तरी उणिवा दूर करीत कडवे आव्हान दिले तर काहीही घडू शकते. सामन्यानंतर दुसºया दिवशी सकाळी स्वत:च्या खेळाचे विश्लेषण करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे खेळाडूंना आपण संघाला अधिक कशी मदत करू शकतो, हे समजण्यास मदत मिळते. दिग्गज संघ नेहमी असेच करतात. विशेषत: मैदानावर आपल्याविरुद्ध गोल कसा झाला, हे बघणे महत्त्वाचे असते. (टीसीएम)
(लेखक यूएफा युरोपा कपमध्ये खेळणारा पहिला भारतीय फुटबॉलपटू आहे आणि भारतीय संघाचा उपकर्णधार आहे.’)

Web Title:  Affecting players' courtesy and discipline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.