गोल नोंदविल्यानंतर अतिउत्साही जल्लोष आवडत नाही - छेत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 12:59 AM2018-06-03T00:59:41+5:302018-06-03T00:59:41+5:30

चायनिज तायपेईवर भारताच्या ५-० ने विजयात करिअरमध्ये तिसऱ्यांदा हॅट्ट्रिक नोंदविणारा भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री विजयाचा उन्माद करताना दिसला नाही. कितीही आनंदी झालो तरी अतिउत्साही जल्लोष मला आवडत नसल्याचे छेत्रीने सामन्यानंतर स्पष्ट केले.

 After registering the goal, do not like extreme apathy - Chhetri | गोल नोंदविल्यानंतर अतिउत्साही जल्लोष आवडत नाही - छेत्री

गोल नोंदविल्यानंतर अतिउत्साही जल्लोष आवडत नाही - छेत्री

मुंबई : चायनिज तायपेईवर भारताच्या ५-० ने विजयात करिअरमध्ये तिसऱ्यांदा हॅट्ट्रिक नोंदविणारा भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री विजयाचा उन्माद करताना दिसला नाही. कितीही आनंदी झालो तरी अतिउत्साही जल्लोष मला आवडत नसल्याचे छेत्रीने सामन्यानंतर स्पष्ट केले.
अंधेरी क्रीडा संकुलात रंगलेल्या या सामन्यात भारताने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा स्वीकारला. १४व्या मिनिटाला जेजे लालपेखलुआने केलेल्या सुरेख पासच्या जोरावर छेत्रीने गोल नोंदवून आघाडी मिळवून दिली. ३४व्या मिनिटाला जेजे आणि छेत्रीच्या जोडीने पुन्हा एकदा कमाल दाखवली व छेत्रीने गोलजाळ्याच्या अगदी डाव्या कोपºयात चेंडू मारून दुसरा गोल केला. ६२व्या मिनिटाला २० वर्षीय अनिरुद्ध थापाने दिलेल्या सुरेख पासचे गोलमध्ये रूपांतर करून छेत्रीने हॅट्ट्रिक साधली. छेत्री परतत असताना संपूर्ण स्टेडियममध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. त्याने या अभिवादनाचा स्वीकार केला. हा छेत्रीचा ९९ वा आंतरराष्टÑीय सामना होता. त्याच्या नावावर ५९ गोल झाले आहेत.
सामन्यानंतर तो म्हणाला,‘गोल करतो तेव्हा मोठा आनंद होतो. क्लब आणि देशासाठी इतके गोल करण्याचा मला मान मिळाला. मी अतिउत्साही होत नाही. मी गोल नोंदविण्यासाठी सारखा धडपडत असतो. एएफसी आशिया चषकात बहारिनविरुद्ध गोल झाल्यास मी जोरदार जल्लोष करणार आहे. आशियाई चषक किंवा आशियाडमध्ये झालेला गोल महत्त्वपूर्ण असल्याने अशा गोलनंतर आनंद साजरा करायला हवा. त्यावेळी सहकाºयांची गळाभेट घेणे मलाही आवडेल. पण हॅट्ट्रिक नोंदविल्याचा देखील मला आनंद आहे.’ भारताचा पुढील सामना छेत्रीचा शंभरावा आंतरराष्टÑीय सामना असेल. (वृत्तसंस्था)

Web Title:  After registering the goal, do not like extreme apathy - Chhetri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.