एएचएल हॉकी: भारतीय महिलांचा दुसरा पराभव, न्यू साऊथ वेल्सने उडवला धुव्वा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 12:41 AM2017-10-01T00:41:30+5:302017-10-01T00:42:03+5:30
भारतीय अ महिला हॉकी संघाला आॅस्ट्रेलिया महिला हॉकी लीगमध्ये न्यू साऊथ वेल्सकडून एकतर्फी लढतीत ७-0 अशा दणदणीत पराभवाला सामोरे जावे लागले. या दौºयात भारतीय संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे.
पर्थ : भारतीय अ महिला हॉकी संघाला आॅस्ट्रेलिया महिला हॉकी लीगमध्ये न्यू साऊथ वेल्सकडून एकतर्फी लढतीत ७-0 अशा दणदणीत पराभवाला सामोरे जावे लागले. या दौºयात भारतीय संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे.
न्यू साऊथ वेल्सने पहिल्या क्वॉर्टरमध्ये ३-0 अशी आघाडी घेतली होती. त्यांच्याकडून एमिली स्मिथने दुसºया मिनिटाला, कोर्टनी शोनेलने सहाव्या मिनिटाला आणि जॅमी हेमिंग्वेने १२ व्या मिनिटाला गोल केला. दुसºया क्वार्टरमध्ये जेसिका वॉटरसनने १८ व्या मिनिटाला न्यू साऊथ वेल्ससाठी चौथा गोल नोंदवला. तिसºया क्वॉर्टरमध्ये भारतीय खेळाडूंनी चांगला बचाव केल्याने न्यू साऊथ वेल्सला गोलपासून वंचित राहावे लागले. दुसरीकडून न्यू साऊथवेल्सचा बचाव भक्कम होता आणि हा बचाव भारतीय खेळाडू भेदू शकले नाहीत. अखेरच्या १५ मिनिटांत न्यू साऊथ वेल्सने आक्रमणाची धार आणखी वाढवली आणि त्याचा फायदा त्यांना ४६ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकद्वारे झाला. त्याचे रूपांतर कॅटलीन नोब्सने गोलमध्ये केले. दोन मिनिटांनंतर पुन्हा मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकचे एमिलीने गोलमध्ये रूपांतर केले. एबिगेल विल्सनने ५२ व्या मिनिटाला आणखी एक गोल करताना संघाची आघाडी ७-0 अशी भक्कम केली. आता भारत अ संघ सोमवारी पुढील लढतीत साऊथ आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळेल. (वृत्तसंस्था)
पुरुषही पराभूत
भारत ‘अ’ पुरुष संघाचाही न्यू साऊथ वेल्स संघाकडून ०-१ असा पराभव झाला. भारत ‘अ’ संघाने पहिल्या सामन्यात वेस्टर्न आॅस्टेÑलियाचा ४-१ असा पराभव करुन लीगला शानदार सुरुवात केली होती. परंतु, तोच धडाका कायम राखण्यात भारतीयांना यश आले नाही.