एआयएफएफ प्रकरण: फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 03:52 AM2017-11-12T03:52:41+5:302017-11-12T03:53:13+5:30
सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देताना अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ)च्या सर्व समित्यांना नियमित कार्य करण्याची परवानगी बहाल केली आहे.
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देताना अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ)च्या सर्व समित्यांना नियमित कार्य करण्याची परवानगी बहाल केली आहे. महासंघाने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकानुसार प्रफुल्ल पटेल एआयएफएफचे अध्यक्ष म्हणून कार्य करू शकतील.
सर्वोच्च न्यायालयाने माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांच्यासह भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार भास्कर गांगुली यांना आठ आठवड्यांत एआयएफएफच्या घटनेची रूपरेषा तयार करण्यासाठी लोकपाल बनविले आहे. त्याआधी, दिल्ली उच्च न्यायालायने राष्ट्रीय क्रीडासंहितेचे पालन न करता निवडणूक घेण्यात आल्याचा ठपका ठेवत पटेल यांची निवड रद्दबातल ठरविली होती. (वृत्तसंस्था)