खेळाडूंच्या पालकांसाठी एआयएफएफ करणार ‘लॉजिस्टिकल’ व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 01:47 AM2017-10-02T01:47:48+5:302017-10-02T01:48:04+5:30

भारताच्या अंडर-१७ फुटबॉल संघातील सदस्यांच्या पालकांना विश्वकप स्पर्धेत आपल्या पाल्यांना खेळताना बघण्याची संधी मिळणार आहे.

AIFF will make 'Logical' arrangement for parents of players | खेळाडूंच्या पालकांसाठी एआयएफएफ करणार ‘लॉजिस्टिकल’ व्यवस्था

खेळाडूंच्या पालकांसाठी एआयएफएफ करणार ‘लॉजिस्टिकल’ व्यवस्था

Next

नवी दिल्ली : भारताच्या अंडर-१७ फुटबॉल संघातील सदस्यांच्या पालकांना विश्वकप स्पर्धेत आपल्या पाल्यांना खेळताना बघण्याची संधी मिळणार आहे. कारण अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) रविवारी स्पष्ट केले की, दिल्लीमध्ये येण्यासाठी त्यांची सर्व ‘लॉजिस्टिकल’व्यवस्था करण्यात येणार आहे.
भारतीय संघातील जास्तीत जास्त खेळाडू गरीब कुटुंबातील आहेत. त्यांच्या पालकांनी म्हटले की, दिल्लीमध्ये आपल्या पाल्यांना खेळताना बघण्यासाठी विमानाच्या तिकिटाचा खर्च करणे शक्य नाही.
एआयएफएफने स्पष्ट केले की,‘फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेला भारतात प्रारंभ होण्यास आणखी पाच दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. भारताच्या अंडर-१७ विश्वकप संघातील सर्व खेळाडूंनी आपल्या पालकांसाठी सर्व ‘लॉजिस्टिक’ व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी एआरएफएफचे आभार व्यक्त केले. त्यामुळे आमच्या पालकांना आम्हाला दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टडियममध्ये सामना खेळताना बघण्याची संधी मिळेल.’
कर्णधार अमरजित म्हणाला,‘एआयएफएफने आमच्या कुटुंबीयांना दिल्लीमध्ये आणण्याची योजना तयार केली आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबीयांना सामना बघण्याची संधी मिळेल. गोवामध्ये एएफसी अंडर-१६ चॅम्पियनशिपदरम्यान (सप्टेंबर २०१५) एआयएफएफने आमचे पालक सामन्यादरम्यान उपस्थित असावे, अशी योजना आखली होती. त्यामुळे आमच्यासाठी ही स्पर्धा संस्मरणीय ठरली होती.’ (वृत्तसंस्था)

चिली संघ कोलकात्यात
कोलकाता : फिफा अंडर -१७ विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी चिलीचा २१ सदस्यीय संघ रविवारी कोलकाता येथे पोहोचला. अर्जेंटिनाचे माजी गोलरक्षक हेर्नान कापुटो संघाचे प्रशिक्षक आहेत.

जर्मनी संघ गोव्यात दाखल
मडगाव : कर्णधार व स्टार खेळाडू जॉन फिएटे आर्प याच्याशिवाय जर्मनीचा संघ रविवारी येथे दाखल झाला. आर्प काही दिवसांनी येथे येणार आहे. जर्मनीचा संघ पहाटे येथे दाखल झाला. मुख्य प्रशिक्षक ख्रिस्तियन वुक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दुपारी सराव सत्रात भाग घेतला.

देशात पहिल्यांदाच होणाºया १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला आता काही दिवसच उरले आहेत. नवी दिल्ली येथील सामन्याने या स्पर्धेला सुरुवात होईल. देशातील सहा केंद्रांवर ही स्पर्धा होत असून त्यात नवी दिल्ली, नवी मुंबई, गोवा, कोची, गुवाहाटी आणि कोलकाता या शहरांचा समावेश आहे. नवी दिल्ली आणि गोवा येथील पं. जवाहरलाल नेहरू स्टेडियमवरील सामने असे.

६ आॅक्टोबरपासून प्रारंभ होणाºया फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत अनेक विक्रम नोंदविले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या फिफा पुरुष स्पर्धेत प्रथमच महिला सहायक रेफरी दिसणार आहे.
फुटबॉल विश्व संचालन संस्था फिफाने स्पष्ट केले की, प्रथमच पुरुष स्पर्धेत महिला सहायक रेफरीचा समावेश करण्यात आला आहे. फिफाने सात सहायक रेफरीची निवड केली आहे, पण प्रथमच पुरुष स्पर्धेसाठी महिला रेफरींची निवड करण्यात आलेली आहे. संयुक्त तयारीमध्ये कामगिरीत सुधारणा दिसून आल्यामुळे एलिट महिला रेफरी आपल्या पुरुष सहकाºयांच्या साथीने पुरुष स्पर्धेत अधिकाºयांची भूमिका बजावण्यास सज्ज असल्याचे दिसून आले आहे.’
फिफाचे रेफरी प्रमुख मासिमो बुसाका म्हणाले,‘एलिट महिला रेफरींना फिफाच्या पुरुष स्पर्धेत संधी देण्याची वेळ आली असल्याचे आम्हाला वाटते. गेल्या वर्षी त्यांनी पुरुषांच्या सामन्यांमध्ये अधिकाºयांच्या साथीने जबाबदारी निभावली होती. आता आम्ही त्यांना स्पर्धेत एकत्र काम करताना बघण्यास उत्सुक आहोत.’

गटातील सामने जिंकण्यास प्रथम प्राधान्य : मेहमत
गटातील सामने जिंकण्यावरच पहिले लक्ष्य असणार आहे, असे मत तुर्कस्तानच्या अंडर -१७ फुटबॉल संघाचे प्रशिक्षक मेहमत हासियोग्लू यांनी व्यक्त केले. अंडर-१७ विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुर्कस्तानचा संघ येथे दाखल झाला.

दिल्ली केंद्र
६ आॅक्टो. १) सायं. ४ वा. कोलंबिया वि. घाना, २) रात्री ८ वा. भारत वि. अमेरिका.
९ आॅक्टो. १) सायं. ४ वा. घाना वि. अमेरिका, २) रात्री ८ वा. भारत वि. कोलंबिया.
१२ आॅक्टो. १) सायं. ४ वा. माली वि. न्यूझीलंड, २) रात्री ८ वा. भारत वि. घाना.
१६ आॅक्टो. १) सायं. ४ वा. अ वि. क संघ,
२) ब वि. ए/सी/डी संघ.

गोवा केंद्र
७ आॅक्टो. १) सायं. ४ वा. जर्मनी वि. कोस्टारिका, २) रात्री ८ वा. इराण वि. गिनिया.
१० आॅक्टो. १) सायं. ४ वा. कोस्टारिका
वि. गिनिया, २) रात्री ८ वा. इराण वि. जर्मनी,
१३ आॅक्टो. सायं. ४ वा. कोस्टारिका वि. इराण, रात्री. ८ वा. नायझेर वि. ब्राझील.
१७ आॅक्टो. १) सायं. ४ वा. क वि. अ/ब/फ,२) रात्री ८ वा. ब वि. फ.
 

Web Title: AIFF will make 'Logical' arrangement for parents of players

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.