अनिकेतचा अष्टपैलू म्हणून उपयोग होऊ शकतो , भारताकडून विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 03:28 AM2017-10-06T03:28:52+5:302017-10-06T03:29:10+5:30

भारतीय संघात महाराष्ट्राचा एकमेव खेळाडू असलेला पुणे क्रीडा प्रबोधिनीचा खेळाडू अनिकेत जाधवचा उपयोग अष्टपैलू खेळाडू म्हणून होऊ शकतो, असे अनिकतेचे मार्गदर्शक जयदीप अंगीरवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Aniket can be used as an all-rounder, India's dream of playing in World Cup is complete | अनिकेतचा अष्टपैलू म्हणून उपयोग होऊ शकतो , भारताकडून विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण झाले

अनिकेतचा अष्टपैलू म्हणून उपयोग होऊ शकतो , भारताकडून विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण झाले

googlenewsNext

शिवाजी गोरे
पुणे : भारतीय संघात महाराष्ट्राचा एकमेव खेळाडू असलेला पुणे क्रीडा प्रबोधिनीचा खेळाडू अनिकेत जाधवचा उपयोग अष्टपैलू खेळाडू म्हणून होऊ शकतो, असे अनिकतेचे मार्गदर्शक जयदीप अंगीरवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
अनिकेतला प्रोत्साहन देण्यासाठी अंगीरवार नवी दिल्लीला जाण्यासाठी मुंबई विमानतळावर आले असता त्यांनी वरील माहिती दिली. ते म्हणाले, की अनिकेत आघाडी फळीत खेळतो. त्याची दोन्ही पायांनी चेंडू ताब्यात ठेवण्याची चपळता आणि समोरच्या खेळाडूला चकविण्याची क्षमता उत्कृष्ट आहे. त्याला जर योग्य वेळी त्याच्या सहकाºयांनी गोलजवळ चेंडू पास केला तर त्याच्यात नक्कीच गोल करण्याची क्षमता आहे. ज्याप्रमाणे क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून एखाद्याला ओळखले जाते, त्याचप्रमाणे संघाचा कर्णधार अनिकेतला आघाडीच्या फळीत कोणत्याही म्हणजे डाव्या किंवा उजव्या बाजूने खेळवू शकतो. अनिकेत या स्पर्धेत त्याच्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करील, असा मला विश्वास आहे.

अनिकेत जाधव हा क्रीडा प्रबोाधिनीचा खेळाडू भारतीय संघात फिफा विश्वचषक स्पर्धेत खेळत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. त्याने देशाचे, महाराष्टÑाचे आणि क्रीडा प्रबोधिनीचे नाव उज्ज्वल करावे. या स्पर्धेसाठी त्याला संपूर्ण महाराष्टÑाच्या क्रीडा क्षेत्राकडून शुभेच्छा! फुटबॉल वन मिलियन मिशनमुळे पूर्ण देशभरात फुटबॉल वातावरणनिर्मिती होणार असून, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या खेळासाठी नवी चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मिशन वन मिलियन हा प्रकल्प पूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणार आहे. मुलांमध्ये फुटबॉलचे वातावरण निर्माण करण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात आला आहे.
- नरेंद्र सोपल, सहसंचालक, राज्य क्रीडा खाते

महाराष्ट्रातील अत्यंत गरीब परिस्थितीतून देशासाठी काहीतरी करण्याच्या हेतूने पुढाकार घेणारा अनिकेत जाधवचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्याने २००८ पासून आपली फुटबॉलची कारकीर्द मार्गदर्शक जयदीप अंगीरवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केली होती. पुणे प्रबोधिनीचे महत्त्वाचे योगदान आहे.
उत्कृष्ट आघाडीचा खेळाडू म्हणून त्याची वेगळी ओळख आहे. त्याच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!
- विजय संतान, पुणे क्रीडा प्रबोधिनी प्राचार्य

अनिकेतला लहानपणापासून फुटबॉलचे वेड होते. तो शाळेत व मैदानावर असताना त्याच्याकडे नेहमी हातात फुटबॉल असायचाच. तो वयाच्या ८ व्या वर्षी सांगली येथे क्रीडा प्रबोधिनीत आला. मी त्याचा फिटनेस घेत असे, कारण प्रथम वर्षी फिटनेस असतो. तेव्हा तो सारखा फुटबॉल खेळायचा. तो रात्री जेव्हा झोपायचा तेव्हा फुटबॉल त्याच्या छातीजवळ कवटाळलेला असायचा. तेव्हा मी वरिष्ठ अधिकाºयांना त्याचे हे फुटबॉलवेड सांगितले. मग दुसºया वर्षी त्याला पुण्यात जयदीप अंगीरवार सरांकडे पाठविले गेले आणि त्याची फुटबॉलच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. - महेश पाटील, अ‍ॅथलेटिक्स मार्गदर्शक

Web Title: Aniket can be used as an all-rounder, India's dream of playing in World Cup is complete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.