सेलिब्रेशन करताना अर्जेंटिनाचा खेळाडू थेट कचऱ्याच्या डब्ब्यात घुसला; पाहा मजेदार Video
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 11:04 PM2022-12-19T23:04:33+5:302022-12-19T23:43:38+5:30
विश्वचषक विजेतेपद पटकावल्यानंतर अर्जेंटिनाचे खेळाडू जल्लोष साजरा करत आहेत.
लिओनेल मेस्सीचा अखेरच्या विश्वचषक स्पर्धेत जेतेपद पटकावण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अर्जेंटिनाच्या प्रत्येक खेळाडूने कोणतीच कसर सोडली नाही. फ्रान्सकडून तोडीसतोड खेळ झाला अन् कायलिन एमबाप्पे एकटा भिडला. 120 मिनिटांच्या सामन्यात 3-3 अशी बरोबरी झाली अन् पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने बाजी मारली आणि फिफा विश्वचषक 2022 वर आपलं नाव कोरलं.
फुटबॉलमध्ये अखेरच्या सेंकदातही काही होऊ शकते याची प्रचिती वर्ल्ड कप फायनलमध्ये आली. 80व्या मिनिटापर्यंत 2-0 अशा आघाडीवर असलेल्या अर्जेंटिनाला 1 मिनिट व 37 सेकंदात दोन धक्के बसले. कायलिन एमबाप्पेच्या दोन गोलने फ्रान्सच्या पाठीराख्यांमध्ये प्राण फुंकले. 8 मिनिटांच्या भरपाई वेळेत दोन्ही संघांच्या गोलरक्षकाने एकेक गोल रोखला अन् सामना अतिरिक्त 30 मिनिटांत गेला. पहिली 15 मिनिटे तोडीसतोड खेळ झाल्यानंतर लिओनेल मेस्सीची जादू पुन्हा चालली अन् त्याने 108व्या मिनिटाला गोल करून अर्जेंटिनाला वर्ल्ड कप जिंकून दिला असे वाटत असताना एमबाप्पेने गोल करून सामना 120 मिनिटांच्या खेळात 3-3 असा बरोबरीत सोडवला.
विश्वचषक विजेतेपद पटकावल्यानंतर अर्जेंटिनाचे खेळाडू जल्लोष साजरा करत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये अर्जेंटिनाचा एक खेळाडू कचऱ्याच्या डब्यात उडी मारतो. यानंतर इतर सहकाऱ्यांनी त्याच्यावर शॅम्पेनचा वर्षाव केला. सदर व्हिडिओची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.
These Argentina celebrations got out of hand 😂😂😂
— ESPN FC (@ESPNFC) December 19, 2022
(via kunaguero/IG) pic.twitter.com/rSxSUt0yvm
दरम्यान, फिफा विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात विजेता झालेल्या अर्जेंटिना संघाला 347 कोटी रुपये बक्षिस म्हणून देण्यात आले आहे. तर उपविजेत्या फ्रान्सच्या संघला 248 कोटी रुपये देण्यात आले आहे. तिसरं स्थान पटकावलेल्या क्रोएशियाला 223 कोटी रुपये आणि चौथ्या स्थानावर असलेल्या मोरक्को 206 कोटी रुपये बक्षिस म्हणून देण्यात आले.
पेनल्टीचा थरार...
कायलिन एमबाप्पे - 1-0 ( फ्रान्स )
लिओनेल मेस्सी - 1-1 ( अर्जेंटीना)
किंग्स्ली कोमन ( संधी गमावली ) - 1-1 ( फ्रान्स)
पॉलो डिबाला - 1-1 ( अर्जेंटिना)
आरेलोना टी चौमेनी ( संधी गमावली ) - 1-2 ( फ्रान्स)
लिएंड्रो पेरेडेस - 3-1 ( अर्जेंटीना)
रँडल कोलो मौनी - 2-3 ( फ्रान्स)
गोंझालो मॉटेई - 4-2 ( अर्जेंटीना)
18 कॅरेट सोन्याचा वापर-
फिफा वर्ल्डकपच्या ओरिजनल ट्रॉफीचं वजन जवळपास 6.175 किलो इतकं आहे आणि ती बनवण्यासाठी 18 कॅरेट सोन्याचा वापर करण्यात आला आहे. ट्रॉफीची लांबी 36.8 सेंटीमीटर आणि व्यास 13 सेंटीमीटर इतका आहे. ट्रॉफीच्या बेसवर मॅलाकाइट स्टोनचे दोन स्तर आवरण देण्यात आलं आहे. 1994 साली या ट्रॉफीमध्ये थोडा बदल करण्यात आला आणि विजेत्या संघाचं नाव लिहिण्यासाठी ट्रॉफीच्या खाली एक प्लेट लावण्यात आली.
एमबाप्पेने रचला इतिहास-
खरं तर फायनलच्या सामन्यात दोन पेनल्टी वाचवणाऱ्या अर्जेंटिनाच्या एमिलियानो मार्टिनेझला सर्वोत्कृष्ट गोलरक्षकाचा 'गोल्डन ग्लोव्हज' पुरस्कार देण्यात आला. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओवरून त्याला टीकेला सामोरे जावे लागत आहे. जगभरातील चाहते त्याच्यावर टीका करत आहेत. 23 वर्षीय एमबाप्पेने हरल्यानंतरही आपल्या खेळाने लोकांची मने जिंकली आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याचा 'गोल्डन बूट' पुरस्कारही एमबाप्पेने पटकावला. लक्षणीय बाब म्हणजे फ्रान्सच्या एमबाप्पेने फायनलमध्ये गोलची हॅटट्रिक करून इतिहास रचला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"