#BestOf2017: वर्षभरात फुटबॉलची क्रेझ वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:16 AM2017-12-29T00:16:57+5:302017-12-29T00:17:55+5:30

२०१७ वर्ष भारतीय फुटबॉलसाठी अनेक प्रकारे महत्त्वपूर्ण आणि अभिमानाचे ठरले. जागतिक क्रमवारीत उंचावलेले स्थान, १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद आणि आशिया चषक स्पर्धेसाठी मिळवलेली पात्रता यांसह अनेक क्षण भारतीय फुटबॉलप्रेमींसाठी लक्षवेधी ठरले.

# BestOf2017: Football crashes over the year | #BestOf2017: वर्षभरात फुटबॉलची क्रेझ वाढली

#BestOf2017: वर्षभरात फुटबॉलची क्रेझ वाढली

Next

२०१७ वर्ष भारतीय फुटबॉलसाठी अनेक प्रकारे महत्त्वपूर्ण आणि अभिमानाचे ठरले. जागतिक क्रमवारीत उंचावलेले स्थान, १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद आणि आशिया चषक स्पर्धेसाठी मिळवलेली पात्रता यांसह अनेक क्षण भारतीय फुटबॉलप्रेमींसाठी लक्षवेधी ठरले. मे महिन्याच्या सुरुवातीला भारतीय फुटबॉलसाठी सर्वांत मोठी आनंदाची बातमी आली. भारतीय संघाने जगातील अव्वल १०० देशांमध्ये स्थान मिळवत शानदार कामगिरी केली. विशेष म्हणजे केवळ तिसºयांदा अव्वल १००मध्ये स्थान मिळवण्यात भारताला यश आले होते. याआधी १९९६ साली भारताने ९४व्या स्थानी झेप घेतली होती. यानंतर याच वर्षी जुलै महिन्यात भारताने फिफा क्रमवारीत ९६वे स्थान पटकावले. गेल्या दोन दशकांमध्ये भारताचे हे दुसरे सर्वोत्तम स्थान ठरले. त्याचवेळी, नोव्हेंबर १९९३ मध्ये भारतीय संघाने ९९वे स्थान पटकावले होते. दरम्यान, यंदाच्या वर्षाची सांगता भरतीय संघाने १०५व्या स्थानाने केली आहे. विशेष म्हणजे २०१७ वर्षाची सुरुवात भारताने १२९व्या स्थानापासून केली होती. आशियाई देशांच्या क्रमवारीत भारतीय संघ कतारनंतर १५व्या स्थानी असून टीम जॉर्डन, बहारीन आणि उत्तर कोरिया यांच्या तुलनेत मात्र भारत पुढे आहे.
टीम इंडियाची तब्बल ७७ स्थानांची झेप
गेल्या दोन वर्षांमध्ये टीम इंडियाने तब्बल ७७ स्थानांची झेप घेतली. स्टीफन कॉन्स्टेनटाइन यांनी फेब्रुवारी २०१५मध्ये दुसºयांदा प्रशिक्षक म्हणून सूत्रे स्वीकारली, तेव्हा भारतीय संघ फिफा क्रमवारीत १७१व्या स्थानी होता. त्यात मार्च २०१५मध्ये संघाची १७३व्या स्थानी घसरण झाली होती. दरम्यान, त्यानंतर सुधारलेल्या मानांकनामध्ये कॉन्स्टेनटाइन आणि त्यांच्या संघाचा सिंहाचा वाटा राहिला आहे. या उंचावलेल्या स्थानामुळे संपूर्ण वर्षभरात भारतीयांमध्ये फुटबॉलची क्रेझ राहिली. त्यामध्ये अधिक भर टाकली ती १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेने.
भारतानं केले  फिफा विश्वचषक स्पर्धेचे आयोजन
‘फिफा’च्या मुख्य स्पर्धांमध्ये आतापर्यंत भलेही भारताला प्रवेश करता आला नसेल, पण २०१७ वर्ष भारताने १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करून गाजवले. भारतीय क्रीडा क्षेत्रात पहिल्यांदाच फिफा स्पर्धेचे आयोजन होत असल्याने संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले होते आणि यजमान म्हणून भारताने अपेक्षेपेक्षा जास्त चांगली कामगिरी करत स्वत:ला सिद्ध केले.
१७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धा आकर्षणाचं केंद्र
भारताच्या, यजमानपदाखाली झालेली १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धा इतिहासातील सर्वाधिक प्रेक्षकसंख्या लाभलेली स्पर्धा ठरली. कोलकाता येथे झालेल्या तिसºया स्थानाच्या सामन्यानंतर प्रेक्षकसंख्या १२ लाख ३० हजार ९७६च्या पार गेली होती.
हा विश्वविक्रम चीनने १९८५ साली आपल्या यजमानपदाखाली केला होता, जो भारताने अंतिम सामन्याआधीच मोडला. याआधी २०११ साली मॅक्सिकोमध्ये झालेल्या युवा विश्वचषक स्पर्धेतही प्रेक्षकसंख्या १० लाख २ हजार ३१४ इतकी झाली होती.
फिफा स्पर्धा खेळणारा पहिला भारतीय संघ म्हणून ऐतिहासिक कामगिरी
युवा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत यजमान भारताचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले. मात्र, त्यांनी आपल्या खेळाच्या जोरावर सर्वांची मने जिंकली. झुंजार खेळाचे प्रदर्शन करत भारतीय युवांनी फिफा स्पर्धा खेळणारा पहिला भारतीय संघ म्हणून ऐतिहासिक कामगिरीही केली. त्याचवेळी, इंग्लंडने पहिल्यांदाच १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक उंचावताना तुल्यबळ स्पेनचा ५-२ असा धुव्वा उडवला. या स्पर्धेत प्रेक्षकांचा जोरदार पाठिंबा मिळालेल्या ब्राझिलला मात्र तिसºया स्थानी समाधान मानावे लागले.
भारताला करावा लागला डोपिंगचा सामना
यंदाच्या वर्षी भारताला डोपिंगचाही सामना करावा लागला. अनुभवी गोलरक्षक सुब्रत पॉल याच्या लघुशंकेच्या नमुन्यामध्ये प्रतिबंधित असलेले टर्बुटेलिन आढळले. साधारणपणे खोकला आणि सर्दीच्या औषधांमध्ये याचे प्रमाण असते. यामुळे सुब्रतला सूचना देऊन सोडण्यात आले; कारण ‘नाडा’ समितीला कल्पना होती की सुब्रत मुद्दामहून डोपिंग उल्लंघन करणार नाही.
इंडियन सुपर लीगला आशियाई फुटबॉल महासंघाची मान्यता
यंदा इंडियन सुपर लीगला आशियाई फुटबॉल महासंघाची मान्यता मिळाली. यामुळे लीगमधील विजेत्या संघाला एएफसी कप स्पर्धेत थेट प्रवेश मिळणार आहे. त्याचप्रमाणे याच वर्षी ऐजल एफसीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देताना आयलीग स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
प्रफुल्ल पटेल व अन्य पदाधिका-यांना निवडणूक लढवण्यास बंदी
वर्षाअखेरीस मात्र भारतीय फुटबॉल क्षेत्राला मोठा धक्का लागला. राष्ट्रीय क्रीडा संहितेचे पालन न केल्याचे सांगत दिल्ली उच्च न्यायालयाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) अध्यक्ष प्रफुल्ल पटेल व अन्य पदाधिका-यांना निवडणूक लढवण्यापासून रोखले. उच्च न्यायालयाने एआयएफएफच्या संविधानामध्ये जरुरी संशोधन करण्यासाठी व पाच महिन्यांमध्ये निवडणूक करण्यासाठी माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांची प्रशासक म्हणून नियुक्तीही केली. मात्र, यानंतर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली होती.

Web Title: # BestOf2017: Football crashes over the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.