भारताचे माजी फुटबॉलपटू गॉडफ्रे परेरा यांच्या हस्ते बिपिन फुटबॉल अकादमीच्या मोफत प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 05:25 PM2022-10-18T17:25:50+5:302022-10-18T17:26:13+5:30
मुंबई: ३४व्या बिपिन फुटबॉल अकादमी मोफत प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन माजी भारतीय फुटबॉलपटू गॉडफ्रे परेरा यांच्या हस्ते रविवारी MCF जॉगर्स पार्क फुटबॉल मैदान, बोरिवली येथे झाले.
मुंबई: ३४व्या बिपिन फुटबॉल अकादमी मोफत प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन माजी भारतीय फुटबॉलपटू गॉडफ्रे परेरा यांच्या हस्ते रविवारी MCF जॉगर्स पार्क फुटबॉल मैदान, बोरिवली येथे झाले. १६ वर्षांखालील मुली आणि मुलांसाठी आयोजित मोफत फुटबॉल शिबिराला १७ ऑक्टोबर २०२२ पासून विविध केंद्रांवर लीग-कम-नॉकआऊट सामन्याच्या स्वरुपात सुरुवात झाली. फायनल १ जानेवारी २०२३ रोजी खेळवण्या येईल. उद्धाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून खासदार गोपाळ शेट्टी, माजी नगरसेवक हरिष छेडा हे देखील उपस्थित होते.
एअर इंडियाचे माजी प्रशिक्षक परेरा यांनी खेळाडूंशी संवाद साधला. चतुर खेळ करण्यासाठी, तंदुरुस्त राहण्यासाठी आणि फुटबॉलमध्ये करिअर करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. “भारतीय फुटबॉलमध्ये लक्षणीय वाढ होत आहे आणि AIFFसह स्थानिक महासंघांनी या खेळाच्या विकासासाठी अनेक पुढाकार घेतले आहेत. मी सर्व खेळाडूंना नवीन कौशल्य संच विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन करतो आणि अन्य खेळाडूंचे अनुकरण न करता प्रत्येकाने त्यांच्या सामर्थ्यानुसार खेळावे,” असे परेरा म्हणाले.
बोरिवली, वसई-विरार, कल्याण, कुर्ला, उल्हासनगर, कुलाबा, अंधेरी आणि मदन पुरा आदी आठ संघांचा या शिबिरात समावेश आहे. १ जानेवारी २००७ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुला-मुलींना शिबिरासाठी पात्र मानले जाईल.
अधिक माहितीसाठी, कृपया संपर्क करा: आलोक कन्नौजिया: 9220889081