बिपिन फुटबॉल प्रशिक्षण २० ऑक्टोबरपासून; मुंबईतील आठ केंद्रांवर शिबिरे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 03:53 PM2019-10-15T15:53:41+5:302019-10-15T15:54:14+5:30
३३व्या बिपिन फुटबॉल अकादमी मोफत प्रशिक्षण शिबिराला कर्नाटक स्पोर्टिंग असोसिएशनच्या मैदानावर सुरुवात होणार आहे
मुंबई : ३३व्या बिपिन फुटबॉल अकादमी मोफत प्रशिक्षण शिबिराला कर्नाटक स्पोर्टिंग असोसिएशनच्या मैदानावर रविवार, २० ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ८ वाजता सुरुवात होणार आहे. १६ वर्षांखालील मुलामुलींसाठी हे प्रशिक्षण शिबीर आहे. यानंतर मुंबईतील आठ केंद्रांवर शिबिरे सुरू होत असून त्यात कुलाबा, चर्चगेट, कफ परेड (बीएमसी शिबीर), वसई, उल्हासनगर, अंधेरी-विलेपार्ले, दहिसर आणि मिरा रोड या केंद्रांचा समावेश आहे. कफ परेड येथील शिबीर २१ ऑक्टोबरपासून सीपीआरए मैदान, कफ परेड येथे सुरू होईल. बिपिन फुटबॉल अकादमीच्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिबिरार्थींना फुटबॉलचे मार्गदर्शन केले जाईल. त्यानंतर डिसेंबरमध्ये दोन दिवसांची आंतरकेंद्र स्पर्धा होईल. त्यात या आठही केंद्रे सहभागी होतील.
ही आठ केंद्रे अशी-
- बीएमसी शिबीर : सीपीआरए मैदान, कफ परेड, मुख्य प्रशिक्षक : माजी राष्ट्रीय खेळाडू स्टीव्हन डायस, संचालक : सालु डिसुझा ७५०६१८४९९०
- दहिसर : दहिसर स्पोर्टस फाऊंडेशन, दहिसर (पू.), मुख्य प्रशिक्षक : फ्रान्सिस न्यून्स, संचालक : प्रताप गावंड ९९२००१०५२९,
- उल्हासनगर : बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल, मुख्य प्रशिक्षक : मोनाप्पा मूल्या, संचालक : श्याम खरात ८०८०९०६२६२.
- अंधेरी-विलेपार्ले : एमव्हीएम एज्युकेशनल कॅम्पस मैदान, वीरा देसाई रोडसमोर, अंधेरी (प.), मुख्य प्रशिक्षक : रणजित मटकर, संचालक : सिद्धार्थ सभापती ७७३८४५०४३१
- वसई : सेंट झेवियर्स इंग्लिश मीडियम स्कूल, माणिकपूर, वसई (प.), मुख्य प्रशिक्षक : एथेन कल्लात, संचालक : रुडॉल्फ स्कुबा ८३९०८९६८९८
- कुलाबा : बॅक गार्डन, मुख्य प्रशिक्षक : अमित भगवाने, संचालक : सुधाकर राणे ९३२२८२३०३५
- चर्चगेट : कर्नाटक स्पोर्टिंग असो. मैदान, मुख्य प्रशिक्षक : बॉस्को फर्नांडिस, संचालक : दिएगो डिसुझा ९३२४३५२५२२
- मिरा रोड : शांती नगर, सेक्टर ९, मुख्य प्रशिक्षक : थॉमस टॉबिज, संचालक : अमित मालवेकर ९८९२८०९३४५