FIFA World Cupवर बहिष्कार टाका; भाजपा नेत्याची मागणी, जाणून घ्या कारण 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 01:11 PM2022-11-22T13:11:10+5:302022-11-22T13:30:24+5:30

FIFA World Cup 2022 : फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेला कालपासून सुरूवात झाली आणि नव्या वादालाही तोंड फुटले. कतारला फुटबॉल वर्ल्ड कपचे यजमानपद जाहीर झाल्यापासून वाद सुरू झालाच होता.

BJP leader Savio Rodrigues calls for FIFA World Cup boycott over Qatar's invite to Zakir Naik  | FIFA World Cupवर बहिष्कार टाका; भाजपा नेत्याची मागणी, जाणून घ्या कारण 

FIFA World Cupवर बहिष्कार टाका; भाजपा नेत्याची मागणी, जाणून घ्या कारण 

googlenewsNext

FIFA World Cup 2022 : फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेला कालपासून सुरूवात झाली आणि नव्या वादालाही तोंड फुटले. कतारला फुटबॉल वर्ल्ड कपचे यजमानपद जाहीर झाल्यापासून वाद सुरू झालाच होता. त्यात येथे मद्यबंदी, महिलांच्या पोषांखावरील बंदी अशा नियमांमुळे नाराजीचा सुरू होताच. आता आणखी एक वाद सुरू झाला आहे आणि त्यात थेट भारतीय जनता पार्टी ( भाजपा) उडी घेतली आहे. भाजपा प्रवक्ता सॅव्हीयो रॉड्रीगेज ( Savio Rodrigues) यांनी फिफा वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे.  

इंग्लंडचा फॅन बिअरच्या शोधात पोहोचला 'शेख'च्या घरात, त्याने दाखवले वाघ, सिंह अन्... Video

रॉड्रीगेज यांनी भारत सरकार, भारतीय फुटबॉल महासंघ व देशातील फुटबॉल प्रेमींना फिफा वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. फिफा वर्ल्ड कप स्पर्धेच्या उद्धाटन सोहळ्याला वादग्रस्त इस्लामिक वक्ता डॉ. झाकीर नाईक ( Zakir Naik) याला बोलवण्यामुळे भाजपाकडून बहिष्काराची मागणी केली गेली आहे. सोशल मीडियावरही #BoycottFifaWorldCup ट्रेंड सुरू झाला आहे. फिफा वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान इस्लाम या विषयावर व्याख्यान देण्यासाठी झाकीर नाईक यांना बोलावले गेले होते.


''झाकीर नाईकवर तेढ निर्माण करणाऱ्या भाषणाचे आणि मनी लाँड्रींगचे आरोप आहेत. त्याच्यावर दहशतवाद्यांना मदतीचेही आरोप आहेत. तो दहशतवादीच आहे. त्याने खुलेआम दहशतवादी ओसामा बीन लादेनचे समर्थन केले होते,''असे रॉड्रीगेज म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: BJP leader Savio Rodrigues calls for FIFA World Cup boycott over Qatar's invite to Zakir Naik 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.