Video : डोळ्यावर पट्टी बांधलेल्या मुलाचं फुटबॉल कौशल्य पाहा; म्हणाल क्या बात, क्या बात...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 12:46 PM2020-05-14T12:46:28+5:302020-05-14T12:46:51+5:30

लॉकडाऊनमुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. त्या पूर्वपदावर येण्यासाठी अजून किती काळ लागेल हेही ठामपणे सांगणे अवघड आहे.

Blindfolded Kid Does Kick-Ups While Skipping In Amazing Video svg | Video : डोळ्यावर पट्टी बांधलेल्या मुलाचं फुटबॉल कौशल्य पाहा; म्हणाल क्या बात, क्या बात...

Video : डोळ्यावर पट्टी बांधलेल्या मुलाचं फुटबॉल कौशल्य पाहा; म्हणाल क्या बात, क्या बात...

Next

लॉकडाऊनमुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. त्या पूर्वपदावर येण्यासाठी अजून किती काळ लागेल हेही ठामपणे सांगणे अवघड आहे. अशात हळुहळू काही देशांमध्ये फुटबॉल सरावांना सुरुवात झाली आहे. पण, अजून स्पर्धा सुरू झालेल्या नाहीत. अशात अस्सल फुटबॉलप्रेमी घरातच खेळाचा आनंद लुटत आहेत. आशियाई फुटबॉल महासंघानं ( AFC) अशाच एका चाहत्याचा व्हिडीओ पोस्ट केला. 24 सेकंदाच्या या व्हिडीओत एक लहान मुलगा डोळ्यावर पट्टी बांधून रस्सीउडी मारून फुटबॉलसोबत खेळताना दिसत आहे. त्याचं हे कौशल्य पाहून तुम्हीही म्हणाल क्या बात, क्या बात...

कोरोना व्हायरसमुळे युएफा चॅम्पियन्स लीग, प्रीमिअर लीग, बुंदेसलीगा आणि ला लिगा या महत्त्वाच्या फुटबॉल स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. 

पाहा व्हिडीओ...

cript async src="//www.instagram.com/embed.js">

मोहम्मद शमीला पत्नी हसीन जहाँमुळे मोठा धक्का; यंदाही मिळणार नाही अर्जुन पुरस्कार 

Photos : विराट-अनुष्काचे मुंबईतील घर पाहिलेत का? चला करूया सफर!

 जगायचं तरी कसं? लॉकडाऊनमुळे महाराष्ट्राच्या खेळाडूवर उपासमारीची वेळ

हार्दिक पांड्याच्या रोमँटिक उत्तरानं नताशा लाजली; TikTok व्हिडीओतून व्यक्त केल्या भावना

Web Title: Blindfolded Kid Does Kick-Ups While Skipping In Amazing Video svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.