होंडुरासविरुद्ध ब्राझीलचे पारडे जड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:47 AM2017-10-18T00:47:51+5:302017-10-18T04:44:58+5:30

गटसाखळीतील सर्व सामने सहज जिंकणा-या दक्षिण अमेरिकेतील दिग्गज संघ ब्राझीलला बुधवारी फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीत होंडुरासच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

 Brazil's Parade heavy against Honduras | होंडुरासविरुद्ध ब्राझीलचे पारडे जड

होंडुरासविरुद्ध ब्राझीलचे पारडे जड

Next

कोची : गटसाखळीतील सर्व सामने सहज जिंकणा-या दक्षिण अमेरिकेतील दिग्गज संघ ब्राझीलला बुधवारी फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीत होंडुरासच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. या लढतीत ब्राझीलचे पारडे जड राहण्याची शक्यता आहे.
चौथ्यांदा जेतेपद पटकावण्याच्या दिशेने वाटचाल करणाºया ब्राझीलने ‘ड’ गटात सर्व सामने जिंकले आहेत. त्यांनी पहिल्या लढतीत स्पेनचा २-१ ने पराभव केला, तर त्यानंतर उत्तर कोरिया व नायजेरविरुद्ध २-० ने विजय मिळवला. ब्राझीलला तीन सामन्यांत केवळ एक गोल खावा लागला, तर त्यांनी सहा गोल नोंदवले. स्ट्रायकर लिंकन व पोलिन्हो या जोडीची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. त्यामुळे ब्राझीलला विनिशियस ज्युनिअरची उणीव भासली नाही. या दोघांनी एकूण पाच गोल नोंदवले, तर ब्रेनेरने एक गोल केला. कोचीचे फुट

बॉल चाहते या लढतीत ब्राझीलचे समर्थन करतील. त्यामुळे होंडुराससाठी ही लढत आणखी खडतर होईल. या फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत ब्राझीलची कोचीमधील ही अखेरची लढत आहे. ब्राझील उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यशस्वी ठरला तर त्यांना रविवारी (दि. २२) कोलकातामध्ये जर्मनीच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.

आफ्रिकी संघांच्या लढतीमध्ये घानाचा सामना नायजरसोबत

नवी मुंबई : दोनदा जेतेपदाचा मान मिळवणाºया घाना संघाला फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीत त्यांच्या उपखंडातील शेजारी नायजरच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. घानाने १९९१ व १९९५ मध्ये जेतेपद पटकावले होते व नव्वदच्या दशकात पाचपैकी चार वेळा अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर मात्र त्यांना कामगिरीत सातत्य राखता आले नाही. नायजर संघ धक्कादायक निकाल नोंदवण्यास सक्षम असल्याची घानाला कल्पना आहे. त्यांनी पाच वेळा जेतेपद पटकावणाºया नायजेरियाचा विभागीय स्पर्धेत पराभव करीत या स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.

नायजेरला ‘ड’ गटात यूरो चॅम्पियन स्पेनने ४-० ने पराभूत केले, तर दक्षिण अमेरिकी चॅम्पियन ब्राझीलकडून त्यांना २-० ने पराभव स्वीकारावा लागला.
नायजरने उत्तर कोरियाचा १-० ने पराभव करीत अंतिम १६ संघांत स्थान मिळवले. दुसºया बाजूचा विचार करता घानाने कॅमेरुनचा ४-० ने आणि गाबोनचा ५-० ने पराभव करीत स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.
त्यांनी गिनियाविरुद्धची लढत गोलशून्यने अनिर्णीत राखली, तर नायजरविरुद्ध पेनल्टीमध्ये सरशी साधली, तर मालीविरुद्ध ०-१ ने पराभव स्वीकारला.


 

Web Title:  Brazil's Parade heavy against Honduras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.