पंतप्रधान मोदींनी उल्लेख केलेल्या कायलिन एमबाप्पेला लागली २७१७ कोटींची लॉटरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 10:25 PM2023-07-24T22:25:50+5:302023-07-24T22:26:17+5:30

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच फ्रान्स दौऱ्यावर गेले होते आणि तिथे त्याने वर्ल्ड कप विजेत्या युवा फुटबॉलपटू कायलिन एमबाप्पेचे ( Kylian Mbappe ) कौतुक केले होते.

BREAKING: Paris Saint Germain have accepted Al Hilal's £259m offer for Kylian Mbappe  | पंतप्रधान मोदींनी उल्लेख केलेल्या कायलिन एमबाप्पेला लागली २७१७ कोटींची लॉटरी

पंतप्रधान मोदींनी उल्लेख केलेल्या कायलिन एमबाप्पेला लागली २७१७ कोटींची लॉटरी

googlenewsNext

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच फ्रान्स दौऱ्यावर गेले होते आणि तिथे त्याने वर्ल्ड कप विजेत्या युवा फुटबॉलपटू कायलिन एमबाप्पेचे ( Kylian Mbappe ) कौतुक केले होते. फ्रान्समध्ये जेवढे एमबाप्पेचे चाहते नाहीत, त्यापेक्षा अधिक चाहते भारतात असल्याचे पंतप्रधान म्हणाले होते. तोच एमबाप्पे आता चर्चेत आला आहे आणि त्याला कारण आहे ती, त्याच्यासाठी लागलेली तगडी बोली. पॅरीस सेंट जर्मेन ( Paris Saint Germain) क्लबकडून खेळणाऱ्या एमबाप्पेसाठी सौदी अरेबियाच्या एल हिलाल क्लबने २५९ मिलियन पाऊंड म्हणजेच जवळपास २७१६ कोटींची बोली लावली आहे. PSG ने ही ऑफर स्वीकारली आहे. पण, एमबाप्पे PSG ची साथ सोडून सौदी अरेबियन क्लबकडून खेळण्यास तयार आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.


यापूर्वी सोमवारी, सौदी अरेबियन क्लबने फ्रान्सच्या स्ट्रायकरसाठी विक्रमी ३०० दशलक्ष युरो बोली लावली होती. पॅरिस सेंट-जर्मेनने आपल्या खेळाडूसाठी ऑफरची पुष्टी केली आणि एमबाप्पेशी थेट वाटाघाटी सुरू करण्यास अल-हिलालला परवानगी दिली. २०१८च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील स्टार खेळाडूने त्याच्या करारावर १२ महिन्यांच्या मुदतवाढीचा पर्याय न घेण्याचा निर्णय घेतल्याने PSG सोबत करारातील अडथळे आहेत.  


पीएसजीने एमबाप्पेला शनिवारी जपानच्या पूर्व-सीझन दौऱ्यातून काढून टाकले. फ्रेंच क्लबने त्याला नवीन करारावर स्वाक्षरी करण्यास खात्री दिल्याशिवाय त्याला विकण्याचा निर्धार केला. अल-हिलालच्या बोलीमुळे एमबाप्पे इतिहासातील सर्वात महागडा फुटबॉलपटू बनला आहे. २०१७ मध्ये बार्सिलोनाच्या नेमारसाठी PSGने $262 दशलक्ष दिले होते आणि एमबाप्पेच्या या बोलीने तोही विक्रम मोडला. 


ही बोली सौदी अरेबियाच्या सर्वात महत्वाकांक्षी हालचालीचे प्रतिनिधित्व करते. ख्रिस्तियानो रोनाल्डोने डिसेंबरमध्ये अल-नासरशी करार करण्यास सहमती दिल्यानंतर सौदी अरेबियाच्या लीगमध्ये जाण्यासाठी करीम बेंझेमा, एन'गोलो कांते आणि रॉबर्टो फिरमिनो ही मोठी नावे खेळताना दिसणार आहेत. लिओनेल मेस्सीने PSG सोडल्यानंतर अल-हिलालएवजी MLS संघ इंटर मियामी क्लबची निवड केली. 

 

Web Title: BREAKING: Paris Saint Germain have accepted Al Hilal's £259m offer for Kylian Mbappe 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.