ब्रेवस्टरने इंग्लंडला पोहोचवले फायनलमध्ये, ब्राझीलचे आव्हान संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:20 AM2017-10-26T00:20:44+5:302017-10-26T00:20:57+5:30

कोलकाता : रियान ब्रेवस्टरने आपल्या जबरदस्त कामगिरीत सातत्य ठेवताना आज येथे स्पर्धेत दुसरी हॅट्ट्रिक नोंदवली. त्याच्या या जबरदस्त कामगिरीच्या बळावर इंग्लंडने विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आणि प्रेक्षकांचा लाडका संघ असणा-या ब्राझीलला ३-१ गोलने पराभूत करताना फिफा अंडर १७ फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली.

Brewmaster delivered to England in the final match, ending Brazil's challenge | ब्रेवस्टरने इंग्लंडला पोहोचवले फायनलमध्ये, ब्राझीलचे आव्हान संपुष्टात

ब्रेवस्टरने इंग्लंडला पोहोचवले फायनलमध्ये, ब्राझीलचे आव्हान संपुष्टात

googlenewsNext

कोलकाता : रियान ब्रेवस्टरने आपल्या जबरदस्त कामगिरीत सातत्य ठेवताना आज येथे स्पर्धेत दुसरी हॅट्ट्रिक नोंदवली. त्याच्या या जबरदस्त कामगिरीच्या बळावर इंग्लंडने विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आणि प्रेक्षकांचा लाडका संघ असणा-या ब्राझीलला ३-१ गोलने पराभूत करताना फिफा अंडर १७ फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली.
याआधी अमेरिकेविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत हॅट्ट्रिक नोंदवणा-या ब्रेवस्टरने १० व्या, ३९ व्या आणि ७७ व्या मिनिटाला असे तीन गोल करताना विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर प्रचंड संख्येने उपस्थित असणाºया ब्राझीलच्या चाहत्यांना निराश केले. ब्राझीलकडून एकमेव गोल वेस्ले याने २१ व्या मिनिटाला केला.
इंग्लंड संघाने प्रथमच अंडर १७ फिफा वर्ल्डकपमध्ये अंतिम फेरीत धडक मारली, तर तीन वेळेसच्या चॅम्पियन ब्राझीलचे २००३ नंतर प्रथमच विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न भंगले. इंग्लंड शनिवारी येथे होणाºया फायनलमध्ये स्पेन आणि माली यांच्यातील दुसºया उपांत्य फेरीत विजयी ठरणाºया संघाविरुद्ध खेळेल.
आजचा उपांत्य फेरीचा सामना याआधी गुवाहाटी येथे खेळवला जाणार होता; परंतु अखेरच्या क्षणी कोलकाता येथे हा सामना स्थलांतरित करण्यात आला. त्यानंतरही येथे या सामन्यासाठी ६३ हजार ८८१ फुटबॉल चाहत्यांनी गर्दी केली होती. प्रेक्षकांकडून ब्राझीलला जबरदस्त पाठिंबा मिळत होता; परंतु इंग्लंडचा संघ आणि त्यांच्या निवडक पाठीराख्यांवर याचा फारसा परिणाम झाला नाही. कारण त्यांच्या संघाने जबरदस्त खेळ केला. इंग्लंडचा मिडफिल्डर एमिली स्मिथ रोवदेखील आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी येथे उपस्थित होता.
पाठीराख्यांचा जबरदस्त पाठिंबादेखील ब्राझीलच्या खेळाडूंकडून त्यांची सर्वोत्तम कामगिरी करवून घेऊ शकला नाही. लिव्हरपूलचा स्ट्रायकर ब्रेवस्टरने कॅलम हडसन ओडाइच्या क्रॉसवर रिबाऊंडवर गोल करीत इंग्लंडला दहाव्या मिनिटांतच आघाडी मिळवून दिली.
तथापि, ब्राझीलने वेस्लेच्या गोलवर बरोबरी साधताना सामन्यात रोमहर्षकता वाढवली. इंग्लंडचा गोलकिपर कुर्टिस अँडरसनने पालिन्होचा शक्तिशाली शॉट रोखला; परंतु वेस्लेच्या शॉटचे त्यांच्याजवळ कोणतेही उत्तर नव्हते.
सामन्यातील रोमहर्षकता शिगेला पोहोचली असतानाच ब्रेवस्टरने स्टीव्ह सेसेगननच्या क्रॉसवर गोल करीत इंग्लंडची पुन्हा आघाडी वाढवली. हा त्याचा स्पर्धेतील सहावा गोल होता. या गोलमुळे स्पर्धेतील सर्वाधिक गोलही त्याच्या नावावर लागले. मध्यंतरापर्यंत इंग्लंडचा संघ २-१ गोलने आघाडीवर होता. तथापि, जर्मनीविरुद्ध उत्तरार्धात जबरदस्त मुसंडी मारत दोन गोल केल्यामुळे ब्राझीलच्या पाठिराख्यांना हा संघ पुन्हा मुसंडी मारून चमत्कार दाखवील, अशी आशा होती; परंतु इंग्लंडने जर्मनीसारखी चूक केली नाही आणि आपली पूर्ण ताकद गोल वाचवण्यासाठी लावली. ब्राझीलने बरोबरीचा गोल करण्यासाठी केलेली घाई त्यांना नडली. कारण त्यामुळे त्यांचा बचाव कमजोर पडला. ब्रेवस्टरने याचा अचूक लाभ घेताना स्थानापन्न एमिले स्मिथ रोव्हच्या खाली राहिलेल्या क्रॉसवर आपला तिसरा गोल केला. ब्राझीलला आता तिसºया स्थानासाठी सामना खेळावा लागणार आहे.

Web Title: Brewmaster delivered to England in the final match, ending Brazil's challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.