चॅम्पियन्स लीग हॉकी : भारताचा पाकिस्ताननंतर अर्जेंटीनावर दमदार विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2018 06:20 PM2018-06-24T18:20:29+5:302018-06-24T18:22:01+5:30
पाकिस्ताननंतर भारताने चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत अर्जेंटीनावर विजय मिळवला. या स्पर्धेतील भारताचा हा सलग दुसरा विजय ठरला.
नवी दिल्ली : पाकिस्ताननंतर भारताने चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत अर्जेंटीनावर विजय मिळवला. या स्पर्धेतील भारताचा हा सलग दुसरा विजय ठरला. भारताने अर्जेंटीनावर 2-1 असा विजय मिळवत स्पर्धेतील दबदबा कायम ठेवला.
HT| The Indian Men's Hockey Team keep up the momentum with a fine performance in the first half, as @13harmanpreet and @mandeepsingh995 score a goal each in their second game of the Rabobank Men's Hockey Champions Trophy on 24th June.#IndiaKaGame#INDvARG#HCT2018pic.twitter.com/OaIq7RjhNn
— Hockey India (@TheHockeyIndia) June 24, 2018
भारताने या स्पर्धेच्या पहिल्या लढतीत पाकिस्तानला 4-0 असे पराभूत करत दणदणीत विजय मिळवला होता. या सामन्यात भारताच्या हरमनप्रीत सिंगने 17 व्या मिनिटाला गोल केला आणि संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 28 व्या मिनिटाला मनदीप सिंगने गोल करत भारताची आघाडी दुप्पट केली. अर्जेंटीनाकडून मॅटिअस पॅराडेसने तिसाव्या मिनिटाला गोल केला. पण त्यानंतर भारताने अर्जेंटीनाला गोल करण्याची संधी दिली नाही आणि सामना 2-1 असा जिंकला.