ख्रिस्तीयानो रोनाल्डो व लिओनेल मेस्सीचा युगांत; फिफाने जाहीर केला सर्वोत्तम खेळाडू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 08:49 AM2018-09-25T08:49:39+5:302018-09-25T08:50:21+5:30
फिफाच्या सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारावर गेली दहा वर्षे ख्रिस्तीयानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी या दोन दिग्गजांचेच वर्चस्व होते. मात्र ती मक्तेदारी अखेरीस संपुष्टात आली.
माद्रिद : फिफाच्या सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारावर गेली दहा वर्षे ख्रिस्तीयानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी या दोन दिग्गजांचेच वर्चस्व होते. मात्र ती मक्तेदारी अखेरीस संपुष्टात आली. क्रोएशियाला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ऐतिहासिक भरारी मारून देणाऱ्या ल्युका मॉड्रीचने 2018 चा फिफा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला. 2008 ते 2017 या कालावधीत रोनाल्डो आणि मेस्सी यांनी प्रत्येकी पाचवेळा हा पुरस्कार जिंकला होता.
Who voted for who? 🤔
— #TheBest (@FIFAcom) September 24, 2018
Here's how national team captains, coaches and media voted in naming the winning players & coaches
Men's Player: https://t.co/IGu7x0F6hI
Women's Player: https://t.co/UhPJKEfxzV
Men's Coach: https://t.co/qeyrfJewu2
Women's Coach: https://t.co/l6tSNfTZgCpic.twitter.com/HJXmrUYTXA
या पुरस्कारासाठी निवडलेल्या अंतिम तीन खेळाडूंमध्ये क्रोएशियाचा मॉड्रीच, पोर्तुगालचा रोनाल्डो आणि इजिप्तचा मोहम्मद सलाह यांच्यात चुरस होती. मेस्सीला दहा वर्षांत प्रथमच अव्वल तिघांत स्थान पटकावता आले नाही. त्यामुळे नव्या आव्हानवीरांत रोनाल्डो बाजी मारतो का, याची उत्सुकता होती. मात्र, यंदा पारडे त्याच्या बाजूने नव्हते.
Congratulations, Luka Modric 👑
— #TheBest (@FIFAcom) September 24, 2018
Winner of #TheBest FIFA Men's Player 2018 🏆#FIFAFootballAwardspic.twitter.com/D489MswXug
"Other players have to be recognised when they have a good year" - Luka Modric hopes more defenders and midfielders can win top player awards in the future pic.twitter.com/T6MK8Fo71z
— Goal (@goal) September 25, 2018
मॉड्रीचने फिफाच्या या पुरस्कारापूर्वी विश्वचषक स्पर्धेतील गोल्डन बॉल आणि युरोपियन सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकला आहे. एकाच वर्षात हे तिन्ही पुरस्कार जिंकणारा तो पहिलाच खेळाडू ठरला.
Congratulations my friend! An unbelievable player and an unbelievable season @lukamodric10 👌🏼👌🏼👌🏼 pic.twitter.com/0lceC1wEaj
— Gareth Bale (@GarethBale11) September 24, 2018
🏆 THE BEST FIFA Men's Player 2018 is...
— Real Madrid C.F. 🇬🇧🇺🇸 (@realmadriden) September 24, 2018
🇭🇷 @lukamodric10#TheBest | #HalaMadridpic.twitter.com/Jhk4ulAGKV