रंगतदार फुटबॉल सामन्यात कुलाबा केंद्राने मारली बाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 09:30 PM2023-01-04T21:30:43+5:302023-01-04T21:31:03+5:30
स्वयंगोलमुळे सामना अटीतटीचा झाला होता, पण प्रतिस्पर्ध्यांना गोलची बरोबरी करता आली नाही
मुंबई: बिपीन फुटबॉल अकॅडमी आयोजित ३४व्या आंतरकेंद्र फुटबॉल स्पर्धेतील १६ वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेत कुलाबा केंद्राने बाजी मारली. अंतिम फेरीत वसई-विरार केंद्रावर 2-1 असा विजय मिळवत त्यांनी बिपीन फुटबॉल ट्रॉफी उंचावली. दहीसर येथील लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदानात झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत तन्मय ठाकूर (१८व्या मिनिटाला) आणि सजीर इद्रिसीच्या (३६व्या मिनिटाला) गोल केला. या दोघांच्या गोलच्या जोरावर दक्षिण मुंबईतील केंद्राने विजय मिळवला. ४०व्या मिनिटाला गोलकीपर नरसिंहा वाल्मिकीच्या स्वयंगोलमुळे थोडी रंगत निर्माण झाली होती. मात्र, कुलाबासाठी सुरुवातीची आघाडी निर्णायक ठरली.
त्याआधी उपांत्य फेरीत कुलाबा केंद्राने उल्हासनगर केंद्रावर २-० अशी मात केली. दुसर्या सामन्यात वसई-विरार केंद्राने कुर्ला केंद्राचा पेनल्टी शूटआउटमध्ये ४-३ असा पराभव केला. वैयक्तिक पुरस्कारांमध्ये कुलाबा केंद्राच्या सजीर इद्रिसी याने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूसह स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू असे दोन्ही पुरस्कार पटकावले. त्याचा सहकारी नरसिंहा वाल्मिकी हा सर्वोत्तम गोलकीपर ठरला. प्रतिभावंत खेळाडूचा मान शुभम माने याने मिळवला. बोरीवली केंद्राने फेअर प्ले अवॉर्ड पटकावले.
माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक स्टीव्हन डायस यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण झाले. यावेळी मुंबई फुटबॉल असोसिएशनचे महासचिव सुधाकर राणे, अभिनेता संजय सुरी आणि बिपीन फुटबॉल अकॅडमीचे अध्यक्ष सतीश उचिल आदी मान्यवर उपस्थित होते. माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक स्टीव्हन डायस यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या कुलाबा केंद्राला जेतेपदाची ट्रॉफी प्रदान करण्यात आली. माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक स्टीव्हन डायस यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण झाले. यावेळी मुंबई फुटबॉल असोसिएशनचे महासचिव सुधाकर राणे, अभिनेता संजय सुरी आणि आणि बिपीन फुटबॉल अकॅडमीचे अध्यक्ष सतीश उचिल आदी मान्यवर उपस्थित होते.