Copa America 2021: पायातून वाहत होतं रक्त तरीही लिओनेल मेस्सी खेळला अन् अर्जेंटिनानं फायनलमध्ये प्रवेश केला!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 10:27 AM2021-07-07T10:27:47+5:302021-07-07T10:28:32+5:30
Copa America 2021: It’s Lionel Messi vs Neymar in final : कोपा अमेरिका २०२१ स्पर्धेचा उपांत्य फेरीचा दुसरा सामना थरारक झाला.
Copa America 2021: It’s Lionel Messi vs Neymar in final : कोपा अमेरिका २०२१ स्पर्धेचा उपांत्य फेरीचा दुसरा सामना थरारक झाला. अर्जेंटिना आणि कोलोम्बिया यांच्यातल्या सामन्यात लिओनेल मेस्सीच्या खेळाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. निर्धारित वेळेत सामना १-१ असा बरोबरीत सुटल्यानंतर पेनल्टी शूटआऊटचा थरार रंगला अन् इमिलियानो मार्टिनेझ ( Emiliano Martínez) हा अर्जेंटिनाच्या विजयाच्या शिल्पकार ठरला. त्यानं कोलोम्बियाचे तीन पेनल्टी शूटआऊट अडवले अन् अर्जेंटिनानं ३-२ ( १-१) अशा फरकाने विजय मिळवला. या सामन्यात अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी याच्या पायातून रक्त वाहत होते आणि तरीही तो मैदानावर अखेरपर्यंत मैदानावर खेळला अन् संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. ( Lionel Messi Plays With Bleeding Ankle)
७व्या मिनिटाला मेस्सीच्या पासवर लौटारो मार्टिनेझनं गोल करून अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली, परंतु ६१व्या मिनिटाला एल डाएझनं गोल करून बरोबरी मिळवली. त्यानंतर अर्जेंटिनाला अनेक सोप्या संधी मिळाल्या, परंतु त्याला अंतिम स्वरूप देण्यात ते अपयशी ठरले. कोलोम्बियाच्या बचावपटूंनी चोख कामगिरी बजावली. ९० मिनिटानंतर अतिरिक्त ३० मिनिटांच्या खेळातही ही बरोबरीची कोंडी तुटली नाही अन् पेनल्टी शूटआऊटचा थरार रंगला.
अर्जेंटिनाकडून मेस्सी, पॅरेडेस, मार्टिनेझ यांनी गोल केले, तर डे पॉलचा प्रयत्न फसला. कोलोम्बियाकडून जे कौड्रॅडो आणि एम बोर्जा यांना गोल करता आला, परंतु डी सांचेझ, वाय मिना व ई कार्डोना यांचे प्रयत्न अर्जेंटिनियन गोलरक्षकानं अडवले अन् संघाला विजय मिळवून दिला.
नेयमार विरुद्ध मेस्सी फायनल
यजमान आणि संभाव्य विजेते असलेल्या बलाढ्य ब्राझीलने अपेक्षित कामगिरी करताना कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. मात्र, यासाठी त्यांना पेरूच्या कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागले. अत्यंत अटीतटीच्या रंगलेल्या या सामन्यात पेरूला १-० असा धक्का देत ब्राझीलने अंतिम फेरी गाठली. निल्टन सांतोस स्टेडियवर झालेल्या या सामन्यातील एकमेव गोल लुकास पाकेटा याने केला