Cristiano Ronaldo : ख्रिस्तियानो रोनाल्डो पुन्हा मँचेस्टर युनायटेडच्या ताफ्यात, तीन वर्षांत युव्हेंट्स क्लब सोडला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 09:45 PM2021-08-27T21:45:55+5:302021-08-27T21:46:10+5:30
ख्रिस्तियानो रोनाल्डोनं इंग्लिश प्रीमिअर लीगमधील मँचेस्टर सिटी क्लबला चकवा देत जुना क्लब मँचेस्टर युनायटेडच्या ताफ्यात दाखल होण्याचा निर्णय घेतला.
ख्रिस्तियानो रोनाल्डोनं इंग्लिश प्रीमिअर लीगमधील मँचेस्टर सिटी क्लबला चकवा देत जुना क्लब मँचेस्टर युनायटेडच्या ताफ्यात दाखल होण्याचा निर्णय घेतला. पोर्तुगालच्या सुपरस्टार फुटबॉलपटूनं इटालियन क्लब युव्हेंटससोबतचा करार शुक्रवारी संपुष्टात आणला ( Cristiano Ronaldo sealed a sensational return to Manchester United as he joined the Premier League club on Friday, ending his time with Serie A giant Juventus)
३६ वर्षीय रोनाल्डोनं २००३ ते २००९ या कालावधीत मँचेस्टर युनायटेडसाठी २९२ सामन्यांत ११८ गोल्स केले आहेत आणि आताचा त्याचा निर्णय म्हणजे तो पुन्हा स्वगृही परतत आहे. शुक्रवारी दिवसभर रोनाल्डो नेमक्या कोणत्या क्लबमध्ये जाणार याची चर्चा सुरू होती. यात मँचेस्टर सिटीचे नाव आघाडीवर होते, परंतु त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी युनायटेडनं कुरघोडी केली अन् अखेरच्या क्षणाला पाच बॅलोन डी ओर पुरस्कार जिंकणाऱ्या रोनाल्डोला आपल्या ताफ्यात घेतले. मँचेस्टर युनायटेडनं म्हटलं की,''युव्हेंटस क्लबकडून रोनाल्डोला आमच्या संघात घेण्याचा आम्हाला आनंद होत आहे. आता फक्त काही पेपरवर्क बाकी आहेत.
Welcome 𝗵𝗼𝗺𝗲, @Cristiano 🔴#MUFC | #Ronaldo
— Manchester United (@ManUtd) August 27, 2021
रोनाल्डोनं २०१८ साली ला लिगा क्लब रेयाल माद्रिदसोबतचा ९ वर्षांचा प्रवास संपवून युव्हेंटसच्या ताफ्यात दाखल होण्याचा निर्णय घेतला. त्यानं तीन वर्षांत इटालियन क्लबकडून १३४ सामन्यांत १०१ गोल्स केले. रेयाल माद्रिदकडून खेळताना रोनाल्डोनं चार चॅम्पियन्स लीग जेतेपदं आणि दोन ला लिगा ट्रॉफी जिंकल्या. त्याच्या नावावर ३० मोठ्या स्पर्धांची जेतेपदं आहेत. त्यात पाच चॅम्पियन्स लीग, चार फिफा क्लब वर्ल्ड कप, सात इपीएल, स्पेन व इटली येथील जेतेपदं आणि पोर्तुगालकडून एक युरो चषक यांचा समावेश आहे.