बलात्काराच्या आरोपानंतरही ख्रिस्तियानो रोनाल्डोला बॅलोन डी'ओर पुरस्काराचे नामांकन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 05:15 PM2018-10-08T17:15:33+5:302018-10-08T17:15:55+5:30
ख्रिस्तियानो रोनाल्डो हे नाव सध्या चर्चेत आहे, ते त्याच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपामुळे.
पॅरिस : ख्रिस्तियानो रोनाल्डो हे नाव सध्या चर्चेत आहे, ते त्याच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपामुळे. या आरोपांमुळे त्याची फुटबॉल कारकीर्द धोक्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत असताना प्रतिष्ठेच्या बॅलोन डी'ओर पुरस्कारासाठी त्याला नामांकन देण्यात आले आहे. फ्रान्स फुटबॉलने सोमवारी या पुरस्कारासाठी 30 नामांकन जाहीर केली. रेयाल माद्रिद क्लबच्या या माजी खेळाडूने माद्रिदला सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स लीग जेतेपद जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्याने मागाली सत्रात माद्रिदचे प्रतिनिधित्व करताना सर्व प्रकारच्या स्पर्धांमधील 44 सामन्यांत 44 गोल केले आहेत.
1956 सालापासून फ्रान्स फुटबॉल हा पुरस्कार देत आहे आणि फुटबॉलपटूंना दिला जाणारा युरोपातील हा सर्वात जुना पुरस्कार आहे. मागील दहा वर्षांत रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांचीच या पुरस्कारावर मक्तेदारी राहिली आहे. या दोघांनी प्रत्येकी पाचवेळा हा पुरस्कार जिंकला आहे.
And it goes on! 5 new nominees for the 2018 Ballon d'Or France Football!
— #ballondor (@francefootball) October 8, 2018
🇧🇪Thibaut Courtois ▶ @thibautcourtois
🇵🇹Cristiano Ronaldo ▶ @Cristiano
🇧🇪Kevin De Bruyne ▶ @DeBruyneKev
🇧🇷Roberto Firmino
🇺🇾Diego Godin ▶ @diegogodin
10/30 #ballondorpic.twitter.com/AJTWe6I0er
या नामांकनामध्ये मँचेस्टर सिटीचा मध्यरक्षक केव्हीन डी ब्रुयनेचाही समावेश आहे. त्याच्या नावावर प्रीमिअर लीग, कॅरेबाओ चषक आणि कम्युनिटी शिल्ड स्पर्धेची जेतेपद आहेत. फिफा विश्वचषक स्पर्धेत तो प्रतिनिधित्व करत असलेल्या बेल्जियमने तिसऱ्या स्थानापर्यंत झेप घेतली होती.