ख्रिस्तियानो रोनाल्डोचा हा गोल पाहून बसेल तुम्हाला धक्का...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2018 03:19 PM2018-04-04T15:19:30+5:302018-04-04T15:19:30+5:30

चॅम्पियन्स लीगच्या सामन्यात रोनाल्डोने जो गोल मारला तो नजरेचे पारणे फेडणारा होता. त्यामुळेच या ‘ बायसिकल‘ किकवर लगावलेल्या गोलची चर्चा संपूर्ण विश्वात रंगत आहे.

Cristiano Ronaldo scores from an outrageous bicycle kick | ख्रिस्तियानो रोनाल्डोचा हा गोल पाहून बसेल तुम्हाला धक्का...

ख्रिस्तियानो रोनाल्डोचा हा गोल पाहून बसेल तुम्हाला धक्का...

googlenewsNext
ठळक मुद्देरोनाल्डोने एका नव्या विक्रमालाही गवसणी घातली आहे. चॅम्पियन्स लीगमधील सलग सामन्यांमध्ये गोल करणारा रोनाल्डो हा पहिला फुटबॉलपटू ठरला आहे.

नवी दिल्ली : ख्रिस्तियानो रोनाल्डो, म्हणजे बऱ्याच जणांच्या गळ्यातील ताईत. आपल्या चपळ खेळाने रोनाल्डोने बऱ्याच वेळा संघाला जिंकवून दिले आहे. पण चॅम्पियन्स लीगच्या सामन्यात रोनाल्डोने जो गोल मारला तो नजरेचे पारणे फेडणारा होता. त्यामुळेच या ‘ बायसिकल‘ किकवर लगावलेल्या गोलची चर्चा संपूर्ण विश्वात रंगत आहे. रियाल माद्रिदचे प्रशिक्षक जिनेदिन झिदान यांनी तर हा फुटबॉलच्या इतिहासातील महान गोल असल्याचे म्हटले आहे.

चॅम्पियन्स लीगमधील रीयल माद्रिद आणि जुवेंटस यांच्यातील सामन्यात रोनाल्डोने हा ऐतिहासिक गोल केला. रोनाल्डोच्य़ा दमदार खेळाच्या जोरावर रीयल माद्रिदने जुवेंटसवर ३-० असा दिमाखदार विजय मिळवला.

 

 

रोनाल्डोने सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला पहिला गोल केला. पण सामन्याच्या ६४व्या मिनिटाला रोनाल्डोने ‘बायसिकल‘ किकवर नेत्रदीपक गोल केला. त्याचा हा गोल पाहून प्रतिस्पर्धी खेळाडूंनाही धक्का बसला. त्याच्या या गोलला तोडच नव्हती. या गोलनंतर रोनाल्डो आपला आनंद साजरा करत होता, पण दुसरीकडे झिदान यांना रोनाल्डोने असा गोल केला त्यावर विश्वासच बसत नव्हता.

 

या सत्रात रोनाल्डोच्या नावावर १४ गोल आहेत, तर २०१८ या वर्षात त्याने २३ गोल केले आहेत. त्याचबरोबर रोनाल्डोने एका नव्या विक्रमालाही गवसणी घातली आहे. चॅम्पियन्स लीगमधील सलग सामन्यांमध्ये गोल करणारा रोनाल्डो हा पहिला फुटबॉलपटू ठरला आहे.

Web Title: Cristiano Ronaldo scores from an outrageous bicycle kick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.