युवा भारतीय फुटबॉल संघाची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 04:09 AM2018-07-21T04:09:34+5:302018-07-21T04:09:41+5:30
२० वर्षाआतील कोटिफ स्पर्धेसाठी २५ सदस्यांच्या भारतीय फुटबॉल संघाची घोषणा करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : २० वर्षाआतील कोटिफ स्पर्धेसाठी २५ सदस्यांच्या भारतीय फुटबॉल संघाची घोषणा करण्यात आली आहे. हा संघ उद्या स्पेनच्या वेलेंशियासाठी रवाना होणार आहे. भारतीय संघामध्ये फिफा १७ वर्षाआतील विश्वचषक २०१७मध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंचा समावेश आहे.
भारतीय संघ २३ आणि २५ जुलै रोजी स्थानिक क्लब विरोधात खेळेल. त्यानंतर कोटिफ स्पर्धेत हा संघ खेळेल. त्यात अर्जेंटिना, व्हेनेझुएला आणि मोर्सिया हे संघ या स्पर्धेत खेळतील.
>कोल्हापूरच्या अनिकेतची चमक
कोल्हापूरचा युवा आंतरराष्ट्रीय फुटबॉलस्टार अनिकेत जाधव याची स्पेन येथील व्हेलिनिका येथे २१ जुलै ते ४ आॅगस्ट दरम्यान होणाऱ्या वीस वर्षांखालील सीओटीआयएफ आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात फॉरवर्ड म्हणून निवड झाली. हा संघ गुरुवारी (दि. १९) स्पेनला रवाना झाला.
या संघात बहुतांशी १७ वर्षांखालील युवा विश्वचषक खेळलेल्या खेळाडूंचा समावेश आहे. भारतीय संघ या दौºयात २३ ते २५ जुलैदरम्यान स्पेन येथील स्थानिक संघांबरोबर सराव सामने खेळेल. त्यानंतर अर्जेंटिना, व्हेनेझुएला, मॉर्टिनीया, मुर्सिया या चार देशांच्या संघाविरुद्ध खेळणार आहे.
संघ : गोलकिपर : प्रभसुखन सिंह गिल, विशाल दुबे, सचिन सुरेश
बचाव फळी : बोरिस सिंह, साहिल पवार, अनवर अली, संजीव स्टॅलिन, जितेंद्र सिंह, आशिष राय, दीपक तांगडी, नरेंद्र, सुमित राठी
मिडफिल्डर : सुरेश सिंह, निथोई मीतेई, अमरजीत सिंह, अभिजीत सरकार, जॅकसन सिंह, एन नाओरेम, राहूल केपी, हरमनप्रीत सिंह, लालेंगमाविया, जश्नदीप सिंह
फॉरवर्ड : राहिम अली, अनिकेत जाधव, अमन छेत्री,
मुख्य प्रशिक्षक : फ्लाईड पिंटो