तो पराभव अद्यापही ब्राझीलच्या स्मरणात...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 02:02 AM2018-06-06T02:02:32+5:302018-06-06T02:02:32+5:30
विश्वचषकाला सुरुवात होण्यास काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. ब्राझीलचे प्रशिक्षक टिटे आणि त्यांचे खेळाडू गतविश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात जर्मनीकडून १-७ ने झालेला अपमानास्पद पराभव विसरलेले नाहीत.
रियो द जेनेरियो : विश्वचषकाला सुरुवात होण्यास काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. ब्राझीलचे प्रशिक्षक टिटे आणि त्यांचे खेळाडू गतविश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात जर्मनीकडून १-७ ने झालेला अपमानास्पद पराभव विसरलेले नाहीत.
ब्राझीलचे चाहतेदेखील खेळाडूंना तो पराभव विसरू देत नाही. सराव आटोपून परतणाऱ्या ब्राझीलच्या खेळाडूंना चाहत्यांकडून झालेली १-७ अशी घोषणा ऐकावी लागली. सध्याच्या संघातील सहा खेळाडू चार वर्षांपूर्वीच्या संघातही होते. सप्टेंबर २०१६ पासून प्रशिक्षक टिटे यांनी संघात आमूलाग्र बदल केले असून, पाचवेळा विश्वचषक विजेता राहिलेला ब्राझील यंदा पुन्हा एकदा जेतेपद पटकवेल, असा विश्वास प्रशिक्षकाला वाटतो. मैदानावरील घोषणा ऐकल्यानंतर चारवेळा विश्वचषक जिंकून देणारा संघाचा स्टार मारियो जगालो म्हणाले,‘या अपमानास्पद टीकेमुळे ब्राझील संघ बलाढ्य होऊन पुढे येईल. चार वर्षांआधी आमच्याकडे सर्वोत्कृष्ट संघ नव्हता. त्यानंतर विजयामुळे आत्मविश्वास उंचावला. विश्वचषकासाठी पात्रता मिळविणारे आम्ही पहिलेच आहोत.’ (वृत्तसंस्था)