Fifa World Cup, Poland : अर्जेंटिनाने पराभूत करूनही पोलंड बाद फेरीत; जाणून घ्या ३६ वर्षांनी कसा करिष्मा घडला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 08:26 AM2022-12-01T08:26:02+5:302022-12-01T08:26:22+5:30
Fifa World Cup, Poland : लिओनेल मेस्सी की लेव्हांडोवस्की यांच्यापैकी कोण बाद फेरीत जातं याची उत्सुकता साऱ्याच फुटबॉलप्रेमींना होती.
Fifa World Cup, Poland : लिओनेल मेस्सी की लेव्हांडोवस्की यांच्यापैकी कोण बाद फेरीत जातं याची उत्सुकता साऱ्याच फुटबॉलप्रेमींना होती. दोन्ही खेळाडू आपापल्या देशाचे स्टार आहेत आणि त्यामुळे अर्जेंटिना विरुद्ध पोलंड सामना पाहण्यासाठी लाखो प्रेक्षक स्टेडियमवर होतेच, शिवाय टेलिव्हिजनचेही रेकॉर्ड मोडले गेले. पहिल्या हाफमध्ये पोलंडने दिलेली झुंज पाहून अर्जेंटिनाचे चाहते तणावात होते, परंतु दुसऱ्या हाफमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. अर्जेंटिनाने अखेरीस हा सामना २-० ने जिंकला, परंतु दोन्ही संघाचे चाहते आनंदी होते. कारण, पराभूत होऊनही पोलंडने बाद फेरीत प्रवेश पटकावला होता. १९८६नंतर प्रथमच पोलंड ते बाद फेरीत खेळणार आहेत. यापूर्वी २००२, २००६ आणि २०१८मध्ये त्यांना अपयश आले होते.
मेस्सी ठरला फेल, रोमहर्षक विजयासह अर्जेंटिनाची Round 16 मध्ये एन्ट्री! पोलंडने झुंजवले
पहिल्या हाफमध्ये ६६ टक्के काळ चेंडूवर ताबा, ३२० पासेस आणि ७ ऑन टार्गेट मारूनही अर्जेंटिनाची पहिल्या हाफमध्ये पाटी पोलंडचा गोलरक्षक सिजेसनीने कोरीच राहू दिली. दुसऱ्या हाफमध्ये अर्जेंटिनाने धडाकेबाज सुरुवात केली आणि दुसऱ्याच मिनिटाला (४६ मि.) मॅक एलिस्टरने मोनिलाच्या पासवर अप्रतिम गोल केला. #Argentina ने १-० अशी आघाडी घेतली. ६१ व्या मिनिटाला एलिस्टरने आघाडी डबल केली असती, परंतु यावेळी चेंडू पोलंडच्या गोलीच्या हाती सहज विसावला. मेस्सीला गोल करण्यात अपयश येत असताना अर्जेंटिनाचे अन्य खेळाडू सुसाट सुटले... ६७ व्या मिनिटाला अलव्हारेजने पोलंडला ०-२ असे बॅकफूटवर फेकले आणि विजयाची नोंद करून बाद फेरीत प्रवेश केला.
Group C kept us on the edge of our seats! #ARG and #POL are heading to the last 16.
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) November 30, 2022
याच गटातील दुसरी निर्णायक लढत सौदी अरेबिया विरुद्ध मेक्सिको अशी सुरू होती. सौदी अरेबियाने पहिल्या सामन्यात अर्जेंटिनाला धक्का दिला होता आणि तेही बाद फेरीच्या शर्यतीत होते. त्यांनी हा लढत जिंकला असता तर पोलंड बाहेर फेकले गेले असते, परंतु मेक्सिकोने २-१ असा विजय मिळवून पोलंडचा मार्ग सोपा केला . मेक्सिको व पोलंड यांचे प्रत्येकी ४ गुण असले तरी गोल डिफरन्समध्ये पोलंडने वर्चस्व राखल्याने त्यांचा बाद फेरीतील प्रवेश निश्चित झाला.
Mexico win but it is not quite enough! @adidasfootball | #FIFAWorldCup
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) November 30, 2022
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"