UEFA Champions Leagueच्या फुटबॉल सामन्यामुळे इटलीत पसरला महाभयंकर Corona Virus? 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 01:25 PM2020-03-27T13:25:18+5:302020-03-27T13:26:45+5:30

सामना पाहण्यासाठी 40 हजार प्रेक्षक स्टेडियमवर उपस्थित होते.

Did this UEFA Champions League football match lead to coronavirus spread in Italy? svg | UEFA Champions Leagueच्या फुटबॉल सामन्यामुळे इटलीत पसरला महाभयंकर Corona Virus? 

UEFA Champions Leagueच्या फुटबॉल सामन्यामुळे इटलीत पसरला महाभयंकर Corona Virus? 

Next

कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 5 लाख 36,454 रुग्ण जगभरात सापडले आहेत. त्यापैकी बरे होणारे रुग्णे हे 1 लाख 24,395 इतके आहेत, तर 24,113 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यापैकी सर्वाधिक मृतांचा आकडा हा एकट्या इटलीतील आहे. इटलीतील 8215 जणांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू पत्करावा लागला आहे. येथील रुग्णांची संख्या ही 80, 589 इतकी आहे आणि दिवसेंदिवस हा आकडा वाढतच चालला आहे. पण, इटलीत कोरोना व्हायरसचा मोठ्या प्रमाणात संसर्ग परसण्यामागचं कारण एक फुटबॉल सामना आहे. तसा दावा करण्यात येत आहे. 

UEFA Champions League मधील इटालियन क्लब अटलांटा आणि स्पेनचा क्लब व्हॅलेंसिया यांच्यात 19 फेब्रुवारीला मिलान येथील सॅन सिरो स्टेडियमवर सामना खेळवण्यात आला होता. हा सामना पाहण्यासाठी 40 हजार प्रेक्षक स्टेडियमवर उपस्थित होते. चॅम्पियन्स लीग स्पर्धेतील उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातील पहिल्या लीग सामन्यात अटलांटानं 4-1 अशा फरकानं पाहुण्या व्हॅलेंसिया क्लबवर विजय मिळवला. या सामन्यानंतर आठवड्याभरात उत्तर इटलीत पहिला कोरोना व्हायरचा रुग्ण आढळला.

हा सामना पाहण्यासाठी बेर्गामो येथील 40 हजार लोकं मिलान येथून घरच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी आले होते. याच बेर्गामो येथे कोरोना व्हायरसचा मोठा प्रभाव आढळून येत आहे. येथे जवळपास 6700 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. इटलीतील ही परिस्थिती पाहता सीरि ए इटालियन लीग 9 मार्चपासून रद्द करण्यात आली आहे. बेर्गामो येथील उत्तरपूर्व शहरात 600 पैकी 134 जणं कोरोनामुळे आजारी पडली आहे, अशी माहिती शहरातील सरचिटणीस गुईडी मारिनोनी यांनी दिली.

महापौर जॉर्जिओ गोरी यांनीही चॅम्पियन्स लीगमुळे कोरोना व्हायरस पसरला असल्याचा दावा केला आहे. ''हा सामना पाहण्यासाठी 40000 लोकांनी मिलान येथे प्रवास केला. उर्वरित लोकं घरातून किंवा पब व बारमध्ये सामना पाहत होते. त्या रात्री कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला असेल, हे नक्की,''असे गोरी यांनी सांगितले.


यापूर्वी अटलांटाचा गोलरक्षक मार्को स्पोर्टिलो हाही कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यानंतर इटलीतील सीरि ए लीगमध्ये आतापर्यंत 15 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह म्हणून सापडले आहेत. व्हॅलेंसिया क्लबनेही त्यांच्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले. तसेच इटालियन लीग विजेत्या युव्हेंटस क्लबमधील पाऊलो डीबाला, ब्लेस मातूडी आणि डॅनिेल रुगानी हेही कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Big Breaking : सचिन तेंडुलकरची राज्य अन् केंद्र सरकारला लाखोंची मदत 

लाखमोलाची मदत; पुण्यातील रोजंदारी कामगारांना MS Dhoniचं आर्थिक सहाय्य

'गोल्डन गर्ल' Hima Dasचा पुढाकार; राज्य सरकारला दिला एका महिन्याचा पगार

Sachin Tendulkarच्या नावानं पैसे गोळा करतोय न्यूझीलंडचा गोलंदाज; पण का?

Web Title: Did this UEFA Champions League football match lead to coronavirus spread in Italy? svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.