इंग्लंड-अमेरिका रंगतदार लढतीची अपेक्षा, फिफा अंडर-१७ फुटबॉल विश्वकप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 02:05 AM2017-10-21T02:05:22+5:302017-10-21T02:05:39+5:30

फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत शनिवारी इंग्लंड आणि अमेरिका यांच्यादरम्यान खेळल्या जाणारी लढत रंगतदार होण्याची अपेक्षा आहे. हे दोन्ही संघ वयोगटातील स्पर्धांमध्ये आपल्या कामगिरीमध्ये सुधारणा करण्यास उत्सुक आहे.

England-America expecting a colorful match, the FIFA U-17 football World Cup | इंग्लंड-अमेरिका रंगतदार लढतीची अपेक्षा, फिफा अंडर-१७ फुटबॉल विश्वकप

इंग्लंड-अमेरिका रंगतदार लढतीची अपेक्षा, फिफा अंडर-१७ फुटबॉल विश्वकप

Next

मडगांव : फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत शनिवारी इंग्लंड आणि अमेरिका यांच्यादरम्यान खेळल्या जाणारी लढत रंगतदार होण्याची अपेक्षा आहे. हे दोन्ही संघ वयोगटातील स्पर्धांमध्ये आपल्या कामगिरीमध्ये सुधारणा करण्यास उत्सुक आहे. कारण स्पर्धेसाठी पात्रता मिळवल्यानंतरही आतापर्यंत उभय संघांना जेतेपद पटकावता आलेले नाही.
अमेरिका संघाची अंडर-१७ विश्वकप स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी १९९९ मध्ये झाली आहे. त्यावेळी त्यांनी चौथे स्थान पटकावले होते. इंग्लंडने एक दशकापूर्वी या स्पर्धेत पदार्पण केले होते आणि आता चौथ्यांदा स्पर्धेत सहभागी होत आहे. २००७ मध्ये या संघाने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यावेळी त्यांना जर्मनीविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. मॅक्सिकोमध्ये २०११ मध्ये जर्मनीने पुन्हा एकदा इंग्लंडला गाशा गुंडाळण्यास भाग पाडले होते तर २०१५ मध्ये चिलीमध्ये इंग्लंड संघ बाद फेरी गाठण्यात अपयशी ठरला होता. आता यापूर्वीच्या संघातील खेळाडू डॅनी वेलबेक व रहीम स्टर्लिंग सीनिअर पातळीवर खेळत आहेत तर स्टार स्ट्रायकर जेडन सांचो आपला क्लब बोरुसिया डोर्टमंडतर्फे खेळण्यासाठी गेला आहे. या स्टार खेळाडूंविनाही इंग्लंड संघात आगेकूच करण्याची क्षमता आहे. इंग्लंड संघासाठी दिलासा देणारी बाब म्हणजे हा संघ अखेर पेनल्टी शूटआऊटचे दुष्टचक्र भेदण्यात यशस्वी ठरला आहे. गोलकीपर कुर्टिस एंडरसनने दडपणाखाली चांगला बचाव केला. त्यामुळे इंग्लंड संघाला जपानविरुद्ध विजय मिळवण्यात यश आले. त्या लढतीत इंग्लंडने ५-३ ने सरशी साधली. जपानविरुद्ध प्री क्वॉर्टरफायनलमध्ये सांचोचे स्थान घेणारा एंजेल गोम्सला कॅलम हडसन ओहोई व फिलिप फोडेन यांच्यासह मधल्या फळीत चांगली कामगिरी करावी लागेल. अमेरिकेच्या आघाडीच्या फळीतील त्रिमूर्ती जोस सार्जेंट, टीम व्हीयाह व आयो अकिनोला इंग्लंडच्या बचावफळीपुढे अडचणी निर्माण करू शकतात. पॅराग्वेविरुद्ध हॅट््ट्रिक नोंदविल्यामुळे व्हीयाहचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. आक्रमणाबाबत चर्चा करताना अमेरिकन संघ वेगवान आहे. त्यामुळे इंग्लंडची बचाव फळी टीमोथी, इयोमा, जोएल लॅटिबियुडियरे, मार्क गुएई आणि जोनाथन पँजो यांचा कस लागणार आहे. (वृत्तसंस्था)

सामना : भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता

Web Title: England-America expecting a colorful match, the FIFA U-17 football World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.