इंग्लंड-बेल्जियम विजयाने निरोप घेण्यास प्रयत्नशील

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 05:29 AM2018-07-14T05:29:42+5:302018-07-14T05:30:30+5:30

कुठलाही संघ विश्वकप स्पर्धेत तिसऱ्या स्थानाची लढत खेळण्यास इच्छुक नसतो, अशी कबुली इंग्लंडचे व्यवस्थापक गॅरेथ साऊथगेट यांनी दिली असली तर शनिवारी बेल्जियमचा पराभव करीत विश्वकप स्पर्धेत विजयाने निरोप घेण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 England-Belgium try to take the victory in last match | इंग्लंड-बेल्जियम विजयाने निरोप घेण्यास प्रयत्नशील

इंग्लंड-बेल्जियम विजयाने निरोप घेण्यास प्रयत्नशील

Next

सेंट पीटर्सबर्ग  - कुठलाही संघ विश्वकप स्पर्धेत तिसऱ्या स्थानाची लढत खेळण्यास इच्छुक नसतो, अशी कबुली इंग्लंडचे व्यवस्थापक गॅरेथ साऊथगेट यांनी दिली असली तर शनिवारी बेल्जियमचा पराभव करीत विश्वकप स्पर्धेत विजयाने निरोप घेण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
क्रोएशियाविरुद्ध अतिरिक्त वेळेत २-१ ने पराभूत झाल्यानंतर इंग्लंडला फिफा विश्वकप स्पर्धेत अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नाही. बेल्जियमला दुसºया उपांत्य लढतीत फ्रान्सविरुद्ध १-० ने पराभव स्वीकारावा लागला.
साऊथगेट म्हणाले, ‘प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास कुठलाही संघ ही लढत खेळण्यास इच्छुक नसतो.’ इंग्लंड मात्र विजय मिळवण्याच्या निर्धाराने उतरत १९६६ नंतर आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यास उत्सुक आहे.
साऊथगेट यांनी सांगितले की,‘देशावासीयांना आमचा अभिमान वाटेल, असा आम्ही खेळ करू. ’
दरम्यान, बेल्जियम व त्यांच्या सुवर्णपिढीचे साक्षीदार खेळाडू २०२२ मध्ये पुन्हा परतण्यास उत्सुक असतील, पण विन्सेट कोम्पनी व जॉन वर्टोनघेन संघात नसतील. प्रशिक्षक राबर्तो मार्टिनेज विश्वकप स्पर्धेत बेल्जियमला सर्वोत्तम निकाल देऊ शकतात. बेल्जियम १९८६ मध्ये चौथ्या स्थानी होता.
मार्टिनेज म्हणाले, ‘आम्ही विजयाने निरोप घेण्यास उत्सुक असून संघ त्याचा हकदार आहे. विश्वकप स्पर्धेत तिसºया स्थानी राहण्याची संधी वारंवार मिळत नाही. त्यामुळे आमच्यासाठी ही महत्त्वाची लढत आहे.’ (वृत्तसंस्था)

गोल्डन बुटच्या शर्यतीत इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन सहा गोलसह सर्वांत आघाडीवर आहे तर बेल्जियमचा रोमेलू लुकाकूने चार गोल नोंदवले आहेत.

Web Title:  England-Belgium try to take the victory in last match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.