Euro 2020 Final : इंग्लंडच्या चाहत्यांना पराभव पचवणे झाले कठीण, इटलीच्या फॅन्सना बेदम मारले, Video
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 11:19 AM2021-07-12T11:19:10+5:302021-07-12T11:19:52+5:30
Euro 2020 Final, England vs Italy : इटलीनं १९६८ नंतर युरोपियन चॅम्पियनशीपचे ( Euro 2020) जेतेपद पटकावताना इंग्लंडवर पेनल्टी शूटआऊटमध्ये १-१ ( ३-२) असा विजय मिळवला.
Euro 2020 Final, England vs Italy : इटलीनं १९६८ नंतर युरोपियन चॅम्पियनशीपचे ( Euro 2020) जेतेपद पटकावताना इंग्लंडवर पेनल्टी शूटआऊटमध्ये १-१ ( ३-२) असा विजय मिळवला. पेनल्टी शूटआऊटमध्ये गेलेल्या या सामन्यात रशफोर्ड, सांचो आणि बी साका या इंग्लंडच्या खेळाडूंना गोल करण्यात अपयश आलं. हेरी केन व एच मार्गुरे यांनी गोल केला, पण इटलीच्या डी बेराडीनं, लिओनार्डो बोनसी, एफ बेर्नाडेसी यांनी गोल करून विजय पक्का केला. पण, हा पराभव पचवणे इंग्लंडच्या चाहत्यांना अवघड गेले अन् निकालानंतर त्यांनी इटलीच्या चाहत्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली.
इंग्लंडला विजेता म्हणून घोषित करायला हवा होता; न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंनी शाल जोडीनं हाणलं...
यूरो स्पर्धेच्या फायनलच्या इतिहासात सर्वात वेगवान गोलचा विक्रम इंग्लंड विरुद्ध इटली यांच्यातल्या सामन्यात नोंदवला गेला. इंग्लंडनं 1.57 मिनिटालाच गोल खाते उघडले, परंतु आतापर्यंत बलाढ्य प्रतिस्पर्धींना कडवी मात देऊन अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या इटलीनं दुसऱ्या हाफमध्ये बरोबरीचा गोल करून इंग्लंड समर्थकांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडवला. दुसऱ्या मिनिटाला मिळालेल्या आघाडीनंतर निर्धास्त झालेल्या थ्री लायन्सला अतिबचावात्मकता महागात पडली. इटलीनं संयमी खेळ करताना चेंडूवर अधिककाळ ताबा ठेवत 90 मिनिटांच्या आणि त्यानंतर अतिरिक्त 30 मिनिटांच्या खेळात सामना 1-1 असा बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले.
उपांत्य फेरीत पेनल्टी शूटआऊटमध्ये इटलीनं माजी विजेत्या स्पेनचे आव्हान संपुष्टात आणले होते. त्यामुळे इंग्लंडच्या चाहत्यांना पेनल्टी शूटआऊटचा थरार नको होता. याही सामन्यात इटलीनं बाजी मारली आणि विम्बल्डी स्टेडियमवर स्मशानशांतता पसरली.
पाहा व्हिडीओ...
اگر ہار برداشت نہ تو کچھ ایسا ہی ہوتا ہے#EnglandvsItaly#EuroFinal#EuroCup2021#Eurocopa2021#Euro2020Final#EuroCupFinals#Italia#ITLAY#UnitedKingdompic.twitter.com/SLhY0oI6uh
— ejaznews (@Ijaz42836990) July 12, 2021
These people, and anybody else behaving like this, should be locked up and serve a lifetime ban from any sporting event pic.twitter.com/hljxV4Hzdo
— David Willey (@david_willey) July 12, 2021
It’s shameful ! through England audience 😱Italy fans were attacked after the game in wembley, London.seeing all the racial slurs being thrown at sancho,Rashford & Saka, I’m so glad for Italy won #EuroCup2021pic.twitter.com/qfLKG0hsQc
— joban chandi (@jobanchandi2) July 12, 2021
And this was BEFORE they lost in penalties #EURO2020pic.twitter.com/pcq1PBJVzu
— Ben Damon (@ben_damon) July 11, 2021