Euro 2020: पॉल पोग्बाचे रोनाल्डोच्या पावलावर पाऊल, समोरून हटवली Heineken ची बॉटल; जाणून घ्या त्यामागचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 03:14 PM2021-06-16T15:14:16+5:302021-06-16T15:16:25+5:30
Euro 2020: ख्रिस्तियानो रोनाल्डोनं Euro 2020च्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत समोरील कोका कोलाच्या दोन बॉटल्स बाजूला केल्या अन् कंपनीला 4 अब्ज डॉलर्सचा तोटा सहन करावा लागला.
Euro 2020: ख्रिस्तियानो रोनाल्डोनं Euro 2020च्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत समोरील कोका कोलाच्या दोन बॉटल्स बाजूला केल्या अन् कंपनीला 4 अब्ज डॉलर्सचा तोटा सहन करावा लागला. रोनाल्डोची ही कृती ताजी असताना फ्रान्सचा स्टार मध्यरक्षक पॉल पोग्बा यानं ( France star midfielder Paul Pogba) रोनाल्डोच्या पावलावर पाऊल ठेवताना पत्रकार परिषदेत समोर असलेली हेनिकेन बिअरची बॉटल उचलून खाली ठेवली. इस्लाम धर्मात मद्य सेवनाला परवानगी नाही आणि पोग्बा हा इस्लाम धर्माचे पालन करतो. त्यामुळे त्यानं ही कृती केली.
ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या 'त्या' कृतीमुळे शेअर बाजार गडगडला, Coca Colaला ४ अब्ज डॉलर्सचा फटका बसला!
मद्याचे कोणत्याची प्रकारच्या प्रमोशनास विरोध करणारा पोग्बा हा पहिला मुस्लिम खेळाडू नाही. इंग्लंडचे क्रिकेटपटू मोईन अली याचाही या गोष्टीला विरोध आहे. त्यामुळेच इंग्लंडनं 2019ची वर्ल्ड कप ट्रॉफी सेलिब्रेशनच्या वेळी मोईन अलीनं शॅम्पेन उडवत असताना माघार घेतली होती. तसेच अली त्याच्या जर्सीवर मद्याची जाहीरात करत नाही. फ्रान्स आणि जर्मनी यांच्यातल्या सामन्यात स्वयंगोलमुळे जर्मनीला हार मानावी लागली. मॅट हुम्मेल्स याच्याकडून 20व्या मिनिटाला झालेल्या स्वयंगोलनं फ्रान्सला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली अन् त्यानंतर जर्मनीला बरोबरीचा गोल करता आला नाही.
After #POR captain Cristiano Ronaldo and his Coca Cola removal, #FRA’s Paul Pogba makes sure there’s no Heineken on display 🍺 #EURO2020
— Sacha Pisani (@Sachk0) June 16, 2021
pic.twitter.com/U9Bf5evJcl
पोर्तुगाल संघाचा कर्णधार अन् जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो Euro 2020 स्पर्धेतील पहिल्या लढतीपूर्वीच चर्चेत आला होता. सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेसाठी कॉन्फरन्स रूममध्ये दाखल होताच टेबलवरील कोका कोलाच्या बॉटल पाहून रोनाल्डो थोडाला नाराज दिसला. रोनाल्डोनं Coca Cola च्या दोन बॉटल्स हलवल्या अन् दुसरीकडे शेअर बाजारही गडगडला. रोनाल्डोच्या त्या कृतीनं Coca Colaचे स्टॉक्स 1.6% टक्क्यांनी कोसळून ते 242 बिलियन अमेरिकन डॉलरवरून 238 बिलियन अमेरिकन डॉलरवर आले. कोका कोला कंपनीला 4 बिलियन अमेरिकन डॉलरचा फटका बसला... भारतीय रक्कमेत सांगायचे तर हे नुकसान 2,93,27,80,00,000 इतके मोठे आहे.