Euro 2020 : ख्रिस्तियानो रोनाल्डोमुळे Coca Cola चं ३ हजार कोटींचं नुकसान, तरीही पटकावला मानाचा पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 10:29 AM2021-07-12T10:29:43+5:302021-07-12T10:45:27+5:30
यूरो २०२० स्पर्धेचे जेतेपद इटलीनं पटकावलं. १९६८नंतर दोनवेळा ( २००० व २०१२) इटलीला जेतेपदानं थोडक्यात हुलकावणी दिली होती, परंतु यावेळी त्यांनी इंग्लंडला त्यांच्याच घरी पराभूत करून ५३ वर्षांनी जेतेपद पटकावले.
यूरो २०२० स्पर्धेचे जेतेपद इटलीनं पटकावलं. १९६८नंतर दोनवेळा ( २००० व २०१२) इटलीला जेतेपदानं थोडक्यात हुलकावणी दिली होती, परंतु यावेळी त्यांनी इंग्लंडला त्यांच्याच घरी पराभूत करून ५३ वर्षांनी जेतेपद पटकावले. पेनल्टी शूटआऊटमध्ये रंगलेल्या सामन्यात इटलीनं १-१ ( ३-२) अशी बाजी मारली. या फायनलनंतरच्या पुरस्कार सोहळ्यात ख्रिस्तियानो रोनाल्डो हे नाव चर्चेत राहिले. गतविजेत्या पोर्तुगालचे आव्हान यंदा उपउपांत्यपूर् फेरीतच संपुष्टात आले आणि रोनाल्डो चर्चेत राहिला तो Coca Colaला बसलेल्या ३ हजार कोटींच्या नुकसानीमुळे. तरीही रोनाल्डोनं या स्पर्धेतील मानाचा गोल्डन बूट पुरस्कार जिंकला. ( Portuguese superstar Cristiano Ronaldo claimed his first European Championship Golden Boot)
इटलीनं 53 वर्षांनंतर पटकावलं यूरो जेतेपद; इंग्लंडचे घरच्या मैदानावर शूट आऊट!
पोर्तुगालचा कर्णधार रोनाल्डो पहिल्या सामन्यापूर्वीच चर्चेत आला. पत्रकार परिषदेत रोनाल्डोनं त्याच्यासमोर ठेवलेल्या दोन कोका कोलाच्या बॉटल बाजूला केल्या अन् पाणी पिण्याचा सल्ला दिला. यूरो स्पर्धेचे प्रायोजक असलेल्या कोका कोलाचे त्यानंतर शेअर गडगडले अन् त्यांना जवळपास ३ हजार कोटींचा फटका बसला. उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत बेल्जियमकडून त्यांना १-० अशी हार मानावी लागली. रोनाल्डोनं या स्पर्धेत सर्वाधिक ५ गोल्स केले आणि त्या ३६० मिनिटाचा खेळ करताना १ गोल करण्यात मदतही केली. त्यामुळे त्याला गोल्डन बूट हा पुरस्कार देण्यात आला.
झेक प्रजासत्ताकच्या पॅट्रीक शिंकनं ४०४ मिनिटांचा खेळ करताना ५ गोल्स केले, परंतु त्यानं एकही गोल करण्यात सहाय्य केले नाही. इंग्लंडचा कर्णधार हेरी केन याला (४) फायनलमध्ये रोनाल्डोला मागे टाकण्याची संधी होती. रोनाल्डोनं प्रथमच युरो चषक स्पर्धेत गोल्डन बूट पुरस्कार जिंकला. युरो स्पर्धेत सर्वाधिक १४ गोल्सचा विक्रम रोनाल्डोच्या नावावर आहे. त्यानं आंतरराष्ट्रीय स्पर्धेत १०९ गोल्स करताना इराणचे स्ट्रायकर अली डाई यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.