भाजपा प्रवेशानंतर 24 तासांतच खेळाडूनं घेतला राजकारणातून संन्यास!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 10:35 AM2020-07-23T10:35:22+5:302020-07-23T10:36:08+5:30

राजकारणात पक्षांतर करणे हे काही नवीन नाही... निवडणूकीच्या तोंडावर अशी पक्षांतर होतच असतात... क्रीडा विश्वातही विविध राजकीय पक्षाचे समर्थक आहेत.

Ex-Footballer Quits Politics Within 24 Hours Of Joining BJP | भाजपा प्रवेशानंतर 24 तासांतच खेळाडूनं घेतला राजकारणातून संन्यास!

भाजपा प्रवेशानंतर 24 तासांतच खेळाडूनं घेतला राजकारणातून संन्यास!

Next

एखाद्या पक्षात प्रवेश केल्यानंतर अवघ्या 24 तासांत राजकारण सोडण्याची घटना कदाचीत प्रथमच घडली असावी. भारताचा माजी फुटबॉलपपटू मेहताब हुसैन यानं बुधवारी राजकारणातून सन्यास घेत असल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे 24 तासांपूर्वी त्यानं भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. 

कोलकाताच्या मैदानांवर मिडफिल्ड जनरल या नावानं हुसैन प्रसिद्ध आहे आणि राजकारण सोडण्याचा निर्णय वैयक्तीक असल्याचे तो म्हणाला. राजकारणात प्रवेश करण्याच्या अचानक घेतलेल्या निर्णयानं त्याच्या कुटुंबीयांना त्रास सहन करवा लागल्यानं, हुसैन व्यथित झाला आहे. इस्ट बंगाल क्लबच्या माजी कर्णधाराने भाजपाचे प्रदेश अध्यक्ष दिलीप घोष यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. पण, हुसैननं आज फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की,''आजपासून मी कोणत्याही राजकीय पक्षासोबत जाणार नाही. माझ्या या निर्णयानंतर मी सर्व हितचिंतकांची माफी मागतो. हा निर्णय घेण्यासाठी माझ्यावर कोणीही दबाव टाकलेला नाही. राजकारणापासून दूर जाण्याचा निर्णय हा माझा वैयक्तीत आहे.''  

हुसैननं भारताकडून 30 सामन्यांत दोन गोल केले आहेत. अधिकाधिक लोकांशी संपर्क वाढवण्यासाठी राजकारणात आल्याचे त्याने सांगितले होते. ''संकट काळात मला माझ्या कुटुंबीयांसोबत राहणे गरजेचे आहे. त्यांच्या हतबल झालेल्या चेहऱ्यांनी माझी झोप उडवली आहे. त्यामुळे मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला होता. पण, राजकारणात येऊन मला ज्यांची सेवा करायची आहे, त्यांनीच मला हा निर्णय चुकल्याचे सांगितले. एक राजकारणी म्हणून त्यांना मला पाहायचे नाही.'' 

हुसैन याच्या या निर्णयानंतर आता राजकारण तापू लागले आहे. पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसकडून धमकी मिळत असल्यानं हुसैन यानं यू-टर्न घेतल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात येत आहे.  

Read in English

Web Title: Ex-Footballer Quits Politics Within 24 Hours Of Joining BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.