लॉकडाऊनमध्ये फुटबॉलपटू ड्रोनने पाठवतोय 35 लाख कंडोम; कोरोना लढ्यात असाही हातभार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 10:10 AM2020-04-21T10:10:36+5:302020-04-21T10:11:33+5:30
लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्या बंद असल्यामुळे काही गोष्टींचा तुडवडा जाणवत आहे.
जगभरात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या 24 लाख 81,866 इतकी झाली आहे. त्यापैकी 1 लाख 70,455 जणांना प्राण गमवावे लागले, तर 6 लाख 51,542 जणं बरी झाली आहेत. अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे सर्वांना घरातच रहावे लागत आहे. अशा काळात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा घरा घरा जाणवत आहे. त्या त्या देशातील सरकार सर्वांना जीवनावश्यक वस्तू मिळतील याची काळजी घेत आहेत. तसेच काही स्वयंसेवी संस्थाही गरजूंपर्यंत जीवनावश्यक वस्तू पुरवत आहेत. पण, काही देशांत अन्यच समस्या उद्भवत आहेत. लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्या बंद असल्यामुळे काही गोष्टींचा तुडवडा जाणवत आहे. त्या गोष्टींमध्ये कंडोमचा समावेश आहे..
कोलंबिया संघाचा आणि न्यूकॅसल क्लबचा माजी फुटबॉलपटू टीनो अॅस्प्रीला कोरोना लढ्यात वेगळ्या रितीनं हातभार लावत आहे. टीनोनं 2014मध्ये त्याच्या नावाचा कंडोम ब्रँड बाजारात आणला होता. लॉकडाऊनमध्ये मलेशियाच्या कॅरेस्क बीएचडी या कंपनीला कंडोमचा प्रोडक्शन काढता येत नाही. त्यामुळे टीनोनं कंडोमचा तुटवडा दूर करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यानं 35 लाख कंडोम ड्रोन द्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे.
टीनो म्हणाला,''कोरोना व्हायरसमुळे लागलेला क्वारंटाईन चांगली गोष्टा नाही. माझ्या कंपनीत अनेक कंडोम आहेत आणि लोकांनी त्याचा वापर करावा, अशी माझी इच्छा आहे. माझ्याकडे आता 35 लाख 80 हजार कंडोम आहेत. लॉकडाऊन संपेपर्यंत आता नवीन प्रोडक्शन घेता येणं शक्य नाही.''
Muy pronto empezamos con @Dronicilio de @CondonesTino para que hagan pedidos en Bogotá y Medellín. pic.twitter.com/ocrlfkvkkq
— Faustino Asprilla (@TinoasprillaH) April 15, 2020
''या व्हायरसमध्ये मुलांना जन्म देणं धोक्याचं आहे. त्यामुळे कंडोमचा वापर करा. मी तुम्हाला निम्म्या किमतीत ते देतोय,'' असंही टीनो म्हणाला.