FIFA Football World Cup 2018 : 80 हजार प्रेक्षकांमधून 'या' अप्सरा वेधणार सर्वांचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 08:11 PM2018-07-15T20:11:14+5:302018-07-15T20:11:44+5:30
फ्रान्सला पाठिंबा देण्यासाठी मॉस्कोतील स्टेडियमवर उपस्थित 80 हजार प्रेक्षकांमधून या पाच अप्सरा सगळ्यांचे लक्ष वेधणार आहेत.
मॉस्को - फुटबॉल विश्वचषकातील विजेता कोण? या प्रश्नाचे उत्तर काही तासांत क्रीडाप्रेमींना मिळेल. मागील महिनाभर या स्पर्धेने फुटबॉलप्रेमींसह जगभरातील क्रीडा रसिकांना खिळवून ठेवले. इंटरटेनमेंटचा हा पॅकेज आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीसह मैदाबाहेरील घडामोडींनीही ही स्पर्धा आकर्षक ठरली आहे. त्यात खेळाडूंच्या वॅग्सच्या (पत्नी आणि प्रेयसी) चर्चा अधिक रंगल्या आणि अंतिम लढतीपूर्वी हेच चित्र पाहायला मिळत आहे. फ्रान्सला पाठिंबा देण्यासाठी मॉस्कोतील स्टेडियमवर उपस्थित 80 हजार प्रेक्षकांमधून या पाच अप्सरा सगळ्यांचे लक्ष वेधणार आहेत.
चॅर्लोट्टे पिरोनी ही फ्रान्सचा विंगर फ्लोरीयन थाऊव्हीन याची गर्लफ्रेंड. मोनॅकोत जन्मलेली चॅलोट्टे पेशाने मॉडल आहे आणि सोशल मिडियावर तिचे बरेच फॉलोअर्स आहेत. फ्रान्सचे माजी प्रशिक्षक लुईस पिरोनी यांची ती नात.
फ्रान्सचा मध्यरक्षक ब्लेस माटुइडी यांची पत्नी इसाबेल्ले अंतिम सामन्याला हजेरी लावणार आहे. लहानपणापासूनच ब्लेस आणि इसाबेल्ले एकत्र आहेत. 2017 मध्ये त्यांनी लग्न केले आणि त्यांना मायलिन, नील आणि एडन ही तीन मुलंही आहेत.
गोलरक्षक ह्युजो लॉरीस आणि मरिन यांनी 2012 मध्ये लग्न केले. या दोघांचा प्रेमविवाह होता आणि 2010 मध्ये त्यांनी एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर त्यांनी विवाह केला. हे जोडपे सध्या लंडन येथे त्यांच्या दोन मुलींसह स्थायिक आहेत.
एरिका चोपरेना ही फ्रान्स संघाचा आक्रमणपटू अँटोइने ग्रिएझमन याची पत्नी. स्पेन येथील सॅन सेबॅस्टीयन येथे शिक्षण घेत असताना एरिका आणि अँटोइने यांची भेट झाली. सहा वर्ष ही दोघे एकमेकांना डेटींग करत होती आणि 2017 मध्ये त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांना मिया नावाची मुलगी आहे.
जेनिफर आणि ऑलिव्हर जिरूड यांनी 2011 मध्ये विवाह केले. काही वर्ष एकमेकांसोबत राहिल्यानंतर या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. 2013 मध्ये त्यांच्या घरी लहान परी जन्माला आली. जेड असे तिचे नाव. त्यानंतर 2016 मध्ये जेनिफरने एका मुलाला जन्म दिला.