FIFA FOOTBALL World Cup 2018: अन् निळी अंडरवेअर ठरतेय ' त्या ' फुटबॅलपटूला लकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2018 20:23 IST2018-06-21T20:22:50+5:302018-06-21T20:23:29+5:30
या विश्वचषकात एका खळाडूला वाटते की, आपण जर निळ्या रंगाची अंडरवेअर घातली तर आपल्याला यश मिळेल.

FIFA FOOTBALL World Cup 2018: अन् निळी अंडरवेअर ठरतेय ' त्या ' फुटबॅलपटूला लकी
मॉस्को : श्रद्धा आणि अंधश्रद्धा या काही व्यक्तींच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असतात. एखादी चांगली गोष्ट करायची असेल तर ती व्यक्ती काही खास गोष्टी करतात. कामगिरीच्या जोरावर विजय मिळवणारे खेळाडूही या गोष्टीला अपवाद नाहीत. पण यंदाच्या फुटबॉल विश्वचषकात तर काही खेळाडूंनी अंधश्रद्धेचा कळस गाठला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण या विश्वचषकात एका खळाडूला वाटते की, आपण जर निळ्या रंगाची अंडरवेअर घातली तर आपल्याला यश मिळेल. हा खेळाडू आहे तरी कोण, याची उत्सुकता तुम्हालाही असेलंच.
प्रत्येक खेळाडूला विश्वचषकात विजय मिळवायचा असतो. त्यासाठी आपल्या खासगी आयुष्यातील काही गोष्टी बदलण्याकडे या खेळाडूंचा कल असल्याचे दिसून आले आहे. कोलंबियाचा गोलरक्षक रॅने हिगुईटा हादेखील असाच एक खेळाडू. आपली कामगिरी चांगली व्हावी, यासाठी तो निळ्या रंगाची अंडरवेअर घालून मैदानात उतरतो. ही गोष्ट त्याने काही आपल्या सहकाऱ्यांना सांगितली आहे. पण अशा गोष्टी करणारा तो एकमेव खेळाडू नक्कीच नाही.
जर्मनी संघाचा आक्रमणपटू मारियो गोमेझ हादेखील चांगली कामगिरी करण्यासाठी काही विशिष्ट गोष्टी करतो. चांगली कामगिरी करण्यासाठी गोमेझ हा डाव्या बाजूला असलेले टॉयलेट वापरतो. काही महत्त्वाच्या सामन्यांपूर्वी गोमेझला त्याचे सहकारी परफ्यूम लावत असल्याची गोष्टही समजली आहे. चांगली कामगिरी करण्यासाठी काही खेळाडू पांढऱ्या रंगाची जर्सी वापरतात, तर काही खेळाडू सामन्यापूर्वी टक्कल पडलेल्या माणसाच्या डोक्यावरून हात फिरवतात. या साऱ्या गोष्टी ऐकाव्या तेवढं नवलंच वाटत राहतं, पण या गोष्टी घडतात एवढं मात्र नक्की.