FIFA Football World Cup 2018 : ...अन् त्याने 'भविष्यवेत्ता' ऑक्टोपस बाजारात नेऊन विकला!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2018 06:30 AM2018-07-05T06:30:00+5:302018-07-05T06:30:00+5:30
फुटबॉल वेड्या लोकांची जगभरात कमी नाही आणि त्यात विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने हा वेडेपणा अधिक वाढलेला दिसत आहे. या खेळाचा मनमुराद आस्वाद घेण्यासाठी ते एकत्र येतात आणि आपापल्या पसंतीच्या संघासाठी चिअर करतात. त्याहीपलिकडे संघाचे भविष्य जाणून घेण्यासाठी त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. त्यामुळेच विश्वचषक स्पर्धेत भविष्य सांगणा-या प्राण्यांचे प्रमाणही वाढले आहे.
मॉस्को - फुटबॉल वेड्या लोकांची जगभरात कमी नाही आणि त्यात विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने हा वेडेपणा अधिक वाढलेला दिसत आहे. या खेळाचा मनमुराद आस्वाद घेण्यासाठी ते एकत्र येतात आणि आपापल्या पसंतीच्या संघासाठी चिअर करतात. त्याहीपलिकडे संघाचे भविष्य जाणून घेण्यासाठी त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. त्यामुळेच विश्वचषक स्पर्धेत भविष्य सांगणा-या प्राण्यांचे प्रमाणही वाढले आहे.
पॉल नावाच्या ऑक्टोपसने 2010च्या विश्वचषक स्पर्धेत केलेल्या सहा सामन्यांचे भाकित खरे ठरली होती. मात्र त्याचा नैसर्गिक मृत्यु झाला होता. त्यानंतर विश्वचषक स्पर्धेत विशेषत : ऑक्टोपस या प्राण्याकडे भविष्यवेत्ता म्हणून पाहिले जाऊ लागले. असाच एक रॅबीयो नावाचा ऑक्टोपस विश्वचषक स्पर्धेत जपान संघाचे भविष्य वर्तवत होता. त्याच्यासमोर तीन वेगवेगळ्या बास्केटमध्ये खाद्य ठेवण्यात आले होते आणि त्या बास्केटला विजय, पराभव आणि बरोबरी अशा तीन निकालाचे टॅग लावण्यात आले होते. रॅबीयो ज्या बास्केटमधले खाद्य उचलेल तो निकाल ग्राह्य धरला जात असे.
रॅबीयोने कोलंबियाविरूद्धच्या लढतीत विजयाच्या, सेनेगलविरूद्ध बरोबरीच्या आणि पोलंडविरूद्ध पराभवाच्या बास्केटमधील खाद्या खाल्ले होते. रॅबीयोचे हे भाकित खरे ठरले होते. मात्र, मासेमार किमिओ अॅबेने पोलंडविरूद्धच्या लढतीपूर्वीच 'भविष्यवेत्ता' ऑक्टोपस बाजारात नेऊन विकले. उपउपांत्यपूर्व फेरीत जपानला बेल्जियमकडून हार मानावी लागली होती.