FIFA Football World Cup 2018  : नेयमारच्या संघाला अंड्यांचा मार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 05:34 PM2018-07-09T17:34:47+5:302018-07-09T17:35:28+5:30

फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील पराभव खेळाडूंपेक्षा त्यांच्या पाठिराख्यांना अधिक जिव्हारी लागतो. त्यामुळे त्यांच्याकडून खेळाडूंना सातत्याने टार्गेट केले जाते. चाहत्यांच्या रोषाचा सामना अनेकदा खेळाडूंना करावा लागतो. त्याचा प्रत्यय माजी विजेत्या ब्राझील संघाला आला. 

FIFA Football World Cup 2018: Brazil Fans Throwing Stones At Team Bus | FIFA Football World Cup 2018  : नेयमारच्या संघाला अंड्यांचा मार

FIFA Football World Cup 2018  : नेयमारच्या संघाला अंड्यांचा मार

ठळक मुद्देरशियात सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पाचवेळा विजेतेपद पटकावणा-या ब्राझीलला गाशा गुंडाळावा लागला.

ब्राझील - फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील पराभव खेळाडूंपेक्षा त्यांच्या पाठिराख्यांना अधिक जिव्हारी लागतो. त्यामुळे त्यांच्याकडून खेळाडूंना सातत्याने टार्गेट केले जाते. चाहत्यांच्या रोषाचा सामना अनेकदा खेळाडूंना करावा लागतो. त्याचा प्रत्यय माजी विजेत्या ब्राझील संघाला आला. 
रशियात सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पाचवेळा विजेतेपद पटकावणा-या ब्राझीलला गाशा गुंडाळावा लागला. तुलनेने दुबळ्या बेल्जियमने 2-1 अशा फरकाने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. या सामन्यात ब्राझिलकडून सर्वाधिक गोलप्रयत्न झाले, परंतु त्यांना अखेरपर्यंत एकाच गोलवर समाधान मानावे लागले. जर्मनी, अर्जेंटिना, स्पेन, उरुग्वे हे प्रबळ दावेदार माघारी परतल्यानंतर ब्राझिल फेव्हरेट मानले जात होते. त्यात उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियम संघ समोर असल्याने उपांत्य फेरी निश्चित मानली जात होती. मात्र, संघाने चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. 
या पराभवानंतर मायदेशात परतलेल्या ब्राझील संघाच्या खेळाडूंना चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. सोशल मीडियावर फिरत असलेल्या व्हिडिओत चाहते संघाच्या बसवर अंडी व दगड फेकत असल्याचे दिसत आहे. तसेच त्यांनी काही काळ ती बस रोखून धरली होती. मात्र, बस सुरू होताच संतापलेल्या चाहत्यांनी पुन्हा बसवर अंडी व दगड फेकले. त्यांना आवरण्यासाठी सुरक्षा रक्षकांना हवेत गोळीबार करावा लागला. 


Web Title: FIFA Football World Cup 2018: Brazil Fans Throwing Stones At Team Bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.