FIFA Football World Cup 2018 : विजयानंतर ब्राझीलचा ‘सांबा’ जल्लोष!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2018 01:15 AM2018-06-28T01:15:48+5:302018-06-28T01:36:01+5:30
सर्बियावर २-० ने मात, माजी विश्वविजेत्यांची उपउपांत्यपूर्व फेरीत धडक
मॉस्को : पाच वेळा विश्वविजेतेपदाचा मुकुट मोठ्या दिमाखात प्राप्त करणाऱ्या ब्राझीलने सर्बियाचा २-० ने पराभव केला. ३५ व्या मिनिटाला पावलिन्हो याने तर ६८ व्या मिनिटाला टिएगो सिल्वा याने गोल नोंदवला. या शानदार विजयानंतर ब्राझीलने यंदाच्या विश्वचषकातही उपउपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. आता त्यांचा पुढील सामना सोमवारी मेक्सिकोविरुद्ध होईल. नेयमारच्या नेतृत्वात विजयी झालेल्या ब्राझीलच्या खेळाडूंनी मैदानात ‘सांबा’ जल्लोष केला.
🇧🇷
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) June 27, 2018
🇨🇭
----
🇷🇸
🇨🇷 pic.twitter.com/0ujVK7lV1P
स्पार्टक स्टेडियमवर झालेल्या ‘ई’ गटातील सामन्यात ब्राझीलने सर्बियाविरुद्ध आज नेहमीपेक्षा वेगळीच व्यूव्हरचना आखली होती. सामन्याच्या सुरुवातीपासून ब्राझीलने अतंत्य शांत आणि संयमी खेळ केला. प्रतिस्पर्धी संघालाही त्यांनी संधी मिळू दिल्या नाहीत. उलट ब्राझीलला पहिल्या हाफमध्ये तीन-चार संधी मिळाल्या होत्या. स्टार खेळाडू नेयमार यानेही संधी दवडल्या. सामन्यात १७ व्या मिनिटापर्यंत चेंडू मध्यभागातच होता. ब्राझील जणू पासिंगचा सराव करीत असल्याचे जाणवत होते. ते संधीच्या शोधात होते. २४ व्या मिनिटाला मिळालेली संधीसुद्धा नेयमारने घालवली. जर्सी नंबर ९ या खेळाडूने नेयमारला पास दिला होता. यावर नेयमारने डाव्या पायाने मारलेल्या फटक्यावर चेंडूला गोलरक्षकाने ढकलून दिशाहीन ठरवले. ३५ व्या मिनिटाला कुतिन्होने बचावपटूंना भेदत धावत येत चेंडू पावलिन्होकडे दिला. चेंडू उसळल्याने पावलिन्हो याने गोलरक्षकाच्या डोक्यावरून चेंडूला जाळीत ढकललेआणि ब्राझीलने आघाडी घेतली. ही आघाडी त्यांनी मध्यंतरापर्यंत कायम राखली.
Boom. #SRBBRA 0-2 pic.twitter.com/eUNFaES3FF
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) June 27, 2018
टिएगो सिल्वाचा शानदार हेडर...
दुसºया सत्रात ब्राझीलने आक्रमक पवित्रा घेतला. दुसºया बाजूने सर्बियानेसुद्धा संधी निर्माण केल्या होत्या. मात्र, आजचा दिवस ब्राझीलचाच होता. सर्बियाच्या जवळ आलेल्या संधी हुकत गेल्या. ६८ व्या मिनिटाला नेयमारने सामन्यातील दुसरी कॉर्नर किक लगावली. चेंडू सरळ गोलजाळ्याकडे गेला. संधीची वाट बघत सज्ज असलेल्या टिएगो सिल्वा याने उंच उडी घेत उत्कृष्ट हेडरद्वारे चेंडूला जाळीत ढकलले. या गोलनंतर सर्बियावर दडपण आले होते. सामन्यात नेयमारला दुसºया सत्रात तीन संधी मिळाल्या होत्या. मात्र, त्या थोडक्यात हुकल्या.
असा आहे रेकॉर्ड...
गेल्या चार विश्वचषकांच्या साखळी सामन्यांत ब्राझीलने एकही सामना गमावला नाही. हा त्यांचा विक्रमच आहे. त्यांनी विश्वचषकाच्या साखळीत आतापर्यंत ३८ सामने खेळले आहेत. त्यांनी २९ सामने जिंकले आणि आठ ड्रॉ केले. सर्बियाविरुद्धदेखील त्यांना विजय किंवा ड्रॉची गरज होती. ब्राझीलचा स्वित्झर्लंडविरुद्ध पहिला सामना १-१ असा बरोबरीत सुटला होता. दुसºया सामन्यात त्यांनी कोस्टारिकाला २-० ने पराभूत केले होते. या दोघांतील गेल्या चार सामन्यांत ब्राझीलने एक सामना जिंकला आहे. तर तीन बरोबरीवर आटोपले. ब्राझीलने सर्बियाविरुद्ध ४ तर सबिर्याने ब्राझीलविरुद्ध २ गोल नोंदवले होते.