FIFA Football World Cup 2018 : विश्वविजेत्यांची गच्छंती, पण खेळातील जादू कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 05:09 AM2018-06-29T05:09:02+5:302018-06-29T05:14:19+5:30

जर्मन फुटबॉलची कधी नव्हती एवढी घसरगुंडी झाली आहे. एवढी नामुष्की त्यांच्यावर याआधी ओढावली नव्हती. नियोजनाचा अभाव आणि चांगल्या खेळाडूंची तीव्र वानवा हीच त्यामागची प्रमुख कारणे.

FIFA Football World Cup 2018: Colombia wins Poland in World Cup, But Sports Magic Continues! | FIFA Football World Cup 2018 : विश्वविजेत्यांची गच्छंती, पण खेळातील जादू कायम!

FIFA Football World Cup 2018 : विश्वविजेत्यांची गच्छंती, पण खेळातील जादू कायम!

Next

रणजीत दळवी
जर्मन फुटबॉलची कधी नव्हती एवढी घसरगुंडी झाली आहे. एवढी नामुष्की त्यांच्यावर याआधी ओढावली नव्हती. नियोजनाचा अभाव आणि चांगल्या खेळाडूंची तीव्र वानवा हीच त्यामागची प्रमुख कारणे. या पार्श्वभूमीवर प्रशिक्षक जोआकिन लो यांना आपल्याकडे गर्ड म्युलर, कार्ल - हाइंझ रुमेनिग किंवा ज्या यर्गन क्लिन्समनकडून त्यांनी सूत्रे हाती घेतली त्यापैकी एखादा दिग्गज स्ट्रायकर संघात असता तर, असे निश्चित वाटले असेल. मात्र दुसरीकडे बड्या तीनपैकी ब्राझीलने चांगली सुधारणा केल्याचे दिसले. त्यांच्यासमोरही गच्छंतीचा धोका होताच. खरोखरच ब्राझीलला विजेतेपद मिळवून देण्यास हे पुरेसे ठरेल? त्यांच्याबाबतीत भाकीत करणे तसे कठीण. पण ते चमत्कार घडवू शकतात, अशी त्यांची ख्याती आहे.
सर्वात मोठा चमत्कार दक्षिण कोरियाने केला. मेक्सिकोने विश्वविजेत्यांना हरविल्यानंतर कोरियासारख्या आशियाई संघाने सिंहासनावरून त्यांना खाली खेचावे ही काय लहानसहान बाब? आपल्याला पात्र होण्याची संधी आहे हे त्यांना ठाऊक होते. ही लढाई अस्तित्वाची नव्हे, तर आगेकूच करण्यासाठी, या उद्देशाने त्यांनी संघर्ष केला. त्यांनी आपली सर्व शक्ती पणास लावली आणि दृढ निर्धाराच्या बळावर आपल्या प्रतिष्ठित शत्रूला अखेर लोळविले. पण या विजयाचे बहुतांश श्रेय गोलरक्षक चाँग ह्यूनला द्यायला हवे. त्याने उत्तरार्धात सुरुवातीलाच मेसूट ओझिलचा तो हेडर विफल ठरविला नसता, तर जर्मनीला खेळावर बऱ्यापैकी पकड घेण्यात यश आले असते.
जर्मनीने सुरुवात चांगली केली होती. पण जुंग वू यंगच्या फ्री किकवर गोलरक्षक न्यूअरचा अंदाज चुकला व तेथूनच जर्मनीच्या पीछेहाटीला सुरुवात झाली. गोल झाला नाही पण त्यांच्या बचावफळीने विश्वास गमाविला. प्रशिक्षक लो यांच्या समस्या वाढतच गेल्या. त्यात जेरोम बोआटेंग हा हुकमी बचावपटू निलंबित झालेला. शिवाय मार्को रॉइस, डेÑक्सलर, रुडिगर यांना त्यांनी बाकावर बसविले. त्यानंतर म्युलर, गोमेझ यांना उतरविले. ओझिल आणि खेदिरासारखे दिग्गज फिके पडत चालले होते हेही पाहणे क्लेशदायी ठरत होते. त्यांचा क्षितिजावरून अस्त होण्याची ही चिन्हे होती!
ब्राझीललाही पॉवलिन्होने दिलेल्या आघाडीनंतर प्रतिकाराचा सामना करावा लागला. त्यांचा गोलरक्षक अ‍ॅलिसन पूर्णपणे गोंधळला होता, परिणामी त्यांच्या बचावफळीमध्ये घबराट पसरली होती. मात्र मिडफिल्डर कुटिन्होचा फॉर्म आणि नेमारला गवसणारा सूर ही त्यांची मोठी जमेची बाजू. नेमारला आपल्या सहकाºयाला चेंडू कधी तरी द्यावासा वाटणे हे त्यांच्यासाठी मोठे सुचिन्ह दिसत आहे.
त्यांचा पुढचा मुकाबला आहे मेक्सिकोशी. स्वीडनने त्यांना बुकलल्याने त्यांचे मनोधैर्य खचलेले असणे हे ब्राझीलच्या पथ्यावर पडू शकते. बचावपटू मार्सिलोची दुखापत कितीशी तीव्र आहे हाही प्रश्न ब्राझीलसमोर असला, तरी फिलिप लुईसने त्याची जागा बºयापैकी भरून काढल्याचे वाटते. पण मार्सिलोचा दबदबा वेगळा आहे, त्याचे काय?
स्वीडनने स्वित्झर्लंडला आपल्या ताकदीचा आणि इराद्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. ही लढत जबरदस्त व्हावी आणि ती जिंकणाºयासमोर मग आव्हान असेल कदाचित बेल्जियम इंग्लंड, कोलंबिया किंवा चक्क जपानचे. हे या संघांच्या शेवटच्या लढतींच्या निकालांवर अवलंबून राहील.
जर्मनीची जरी गच्छंती झाली, तरी कडव्या चाहत्यांना हवी ती मेजवानी ब्राझील, अर्जेंटिना आणि युरोपातील दिग्गज पोर्तुगाल, स्पेन आणि फ्रान्स पेश करू शकतात. रोनाल्डो, मेस्सी, नेमार, इनिएस्टा आणि लुईस सुआरेजसारखे दिग्गज घोडामैदानात असता जादूभरा फुटबॉल पाहावयास मिळणार यावर शंका-आक्षेप आहे कोणाला?

Web Title: FIFA Football World Cup 2018: Colombia wins Poland in World Cup, But Sports Magic Continues!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.