FIFA Football World Cup 2018 : क्रोएशियाच्या फुटबॉलपटूकडून फॅन्ससाठी अडीच लाखांच भन्नाट गिफ्ट !!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 06:39 PM2018-07-10T18:39:41+5:302018-07-10T18:40:17+5:30

क्रोएशियाच्या फुटबॉल संघाने अविश्वसनीय कामगिरी करताना विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. 1998नंतर त्यांना प्रथमच विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करता आला आहे. बुधवारी त्यांना इंग्लंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. या सामन्याच्या पुर्वसंध्येला क्रोएशियाचा स्ट्रायकर मारियो मँडझुकीचची हृदयस्पर्शी गोष्ट समोर आली आहे. 

FIFA Football World Cup 2018: Croatia striker Mario Mandzukic spends Rs 2.7 lakh for fans | FIFA Football World Cup 2018 : क्रोएशियाच्या फुटबॉलपटूकडून फॅन्ससाठी अडीच लाखांच भन्नाट गिफ्ट !!!

FIFA Football World Cup 2018 : क्रोएशियाच्या फुटबॉलपटूकडून फॅन्ससाठी अडीच लाखांच भन्नाट गिफ्ट !!!

Next

मॉस्को - क्रोएशियाच्या फुटबॉल संघाने अविश्वसनीय कामगिरी करताना विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. 1998नंतर त्यांना प्रथमच विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करता आला आहे. बुधवारी त्यांना इंग्लंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. या सामन्याच्या पुर्वसंध्येला क्रोएशियाचा स्ट्रायकर मारियो मँडझुकीचची हृदयस्पर्शी गोष्ट समोर आली आहे. 
उपांत्यपूर्व फेरीत क्रोएशियाने थरारक सामन्यात यजमान रशियावर रोमहर्षक विजय मिळवला होता. 120 मिनिटांच्या खेळात सामना 2-2 असा बरोबरीत सुटला होता. त्यामुळे पेनल्टी शूटआऊटमध्ये गेलेल्या लढतीत क्रोएशियाने 4-3 अशी बाजी मारली. निर्धारित वेळेतील एका गोलमध्ये मँडझुकीचने साहाय्य केले होते. 
युव्हेंटस क्लबच्या मँडझुकीचने तो राहत असलेल्या स्लाव्होंस्की ब्रॉड येथील चाहत्यांसाठी 2.7 लाख रुपयांची बिअर खरेदी केल्याचे एका वृत्तानंतर समोर आले आहे. 63 हजार लोकसंख्या असलेल्या शहरातील अनेक जण रशियाविरूद्धची लढत पाहण्यासाठी मुख्य चौकात जमले होते. त्यांच्या बिअरचा खर्च मँडझुकीचने उचलला. 


  

Web Title: FIFA Football World Cup 2018: Croatia striker Mario Mandzukic spends Rs 2.7 lakh for fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.