FIFA Football World Cup 2018 : आईसलँडवर विजयासह क्रोएशिया अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 01:56 AM2018-06-27T01:56:17+5:302018-06-27T01:57:45+5:30
इव्हान पर्सिकने केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर क्रोएशियाने आईसलँडवर विजय मिळवत ' ड ' गटात अव्वल स्थान पटकावले आहे.
मॉस्को : इव्हान पर्सिकने केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर क्रोएशियाने आईसलँडवर विजय मिळवत फुटबॉल विश्वचषकातील ' ड ' गटात अव्वल स्थान पटकावले आहे. क्रोएशियाच्या मिलान बॅडेल्जने 53व्या मिनिटाला गोल केला होता. त्यानंतर आईसलँडच्या गिल्फी सिग्युर्डसन 76व्या मिनिटाला गोल करत सामन्यात 1-1 अशी बरोबरी केली होती. पण त्यानंतर पर्सिकच्या निर्णायक गोलमुळे क्रोएशियाने विजय मिळवला.
Maximum points for #CRO as they top Group D.
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) June 26, 2018
They face #DEN on Sunday in Round of 16. pic.twitter.com/SeKh61ubGt
पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात यश मिळाले नाही. पण दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांनी जोरदार आक्रमणे लगावली. यामध्ये क्रोएशियाला प्रथम यश मिळाले. सामन्याच्या 53व्या मिनिटाला गोल करत पर्सिकने क्रोएशियाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली होती. पण आईसलँडने या गोलचा वचपा काढला. सामन्याच्या 76व्या मिनिटाला सिग्युर्डसनने स्पॉट किकवर गोल केला आणि संघाला 1-1 अशी बरोबरी करून दिली.
सामन्याची निर्णायक 90 मिनिटे संपायला काही अवधी शिल्लक होता. तेव्हा क्रोएशियाने जोरदार आक्रमण लगावले आणि यामध्ये त्यांना यशही आले. सामन्याच्या 90व्या मिनिटाला पर्सिकने निर्णायक गोल करत क्रोएशियाला विजय मिळवून दिला.