FIFA Football World Cup 2018 : क्रोएशियामध्ये चाहत्यांनी फायनलपूर्वीच धरला ठेका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 19:36 IST2018-07-15T19:33:33+5:302018-07-15T19:36:34+5:30
या जल्लोशाच्या मध्यभागी एक बँड पथक होते आणि त्या पथकाला शेकडो चाहत्यांनी गराडा घातला होता.

FIFA Football World Cup 2018 : क्रोएशियामध्ये चाहत्यांनी फायनलपूर्वीच धरला ठेका
झागरेब : विश्वचषकाचा अंतिम सामना सुरु होण्यापूर्वीच क्रोएशियामध्ये चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. क्रोएशियाचे नागरिक एका चौकामध्ये एकत्र आले आणि त्यांनी आपल्या संघाला शुभेच्छा देण्यासाठी जल्लोश केला. या जल्लोशाच्या मध्यभागी एक बँड पथक होते आणि त्या पथकाला शेकडो चाहत्यांनी गराडा घातला होता. बँड पथकाच्या तालावर यावेळी क्रोएशियाच्या नागरिकांनी चांगलाच ठेका ठरला होता.
Croatia right now... 🙌🏻🥇 pic.twitter.com/WpbozbgRR6
— Mosleh (@baddiemakhet) July 15, 2018
क्रोएशियाचा संघ पहिल्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यामुळे त्यांना गमावण्यासारखे काहीचं नाही. आतापर्यंत विश्वचषकात त्यांनी एकही सामना गमावललेला नाही. त्यामुळे त्यांच्यावर या सामन्याचे फ्रान्सपेक्षा जास्त दडपण नसेल, असे म्हटले जात आहे.